हंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

कुपवाडातील हंदवाडामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती सोमवारी सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. 

Updated: Nov 21, 2017, 02:48 PM IST
हंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान title=

जम्मू-काश्मीर : कुपवाडातील हंदवाडामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती सोमवारी सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. 

यावेळी आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. हे तिनही दहशतवादी लष्कर ए तोयब्बाचे आहेत. या कारवाईनंतरही सुरक्षादलाने कुपवाडामध्ये सर्च ऑपरेशन सुरूच ठेवलं असून अजून दहशतवादी आहेत का याचा शोध जवान घेताहेत. 

जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत आतापर्यंत १९० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.