नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना एक मोठा विजय प्राप्त झाला आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधल्या 3 शूटर्सला अटक करण्यात आली आहे. या तीन शूटरचा यूपीच्या शिया वक्फ बोर्डातील चेअरमन वसीम रिझवी यांना मारण्याचा प्लान होता. दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलाला याबाबत सूचना मिळाली होती. बुलंदशहरमध्ये डी अंपनीचे शूटर्स किती खतरनाक प्लान करतात
Three people arrested on charges of conspiring to kill Shia Waqf Board Chairman Wasim Rizvi on behest of Dawood Ibrahim: DCP Special Cell #Delhi
— ANI (@ANI) April 13, 2018
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करून आरिफ, अबरार आणि सलीम नावाच्या तीन शूटर्सना अटक केलं आहे. या तिघांना सतत डी कंपनिच्या संपर्कात असल्याच पाहिलं आहे. पोलिसांना या लोकांच्या जवळ शस्त्र असल्याचे कळले आणि त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले.
उल्लेखनीय हे आहे की या अगोदर दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळचा फारूक टकला याला देखील पोलिसांनी मुंबईतून अटक केलं. 1993 ब्लास्टनंतर 1995 मध्ये फारूकला रेड कॉर्नर नोटीस पाठवली होती.