बाबो! 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरण्यासाठी मनी हाईस्ट सारखी स्ट्रॅटेजी? मध्यरात्री बोलेरोतून आले आणि...

चोरीची एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यामध्ये या चोरांनी थेट 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरत पोबारा केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Updated: Nov 9, 2022, 05:42 PM IST
बाबो! 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरण्यासाठी मनी हाईस्ट सारखी स्ट्रॅटेजी? मध्यरात्री बोलेरोतून आले आणि... title=

Money Hiest Style Potato Theft : आपल्या आसपास चोरीच्या अनेक घटना घडत असतात. चोरीच्या घटना घडणं तसं नवीन नाही. अशा घटनांची अनेकदा दखलही घेतली जात नाही. मात्र समोर आलेली 'ही' घटना जरा वेगळी आहे. ज्याप्रकारे काही घटनांची दखलही घेतली जात नाही, त्याप्रकारे अशा अनेक घटना घडतात, ज्या लोकं कधीही विसरू शकत नाही. ही अशीच काहीशी घटना. ते तिघे येतात काय आणि तीन क्विंटल बटाटे आणि पंचवीस किलो टमाटे चोरून नेतात ( Tomato And Potato Theft)  काय? आता या घटनेचा CCTV व्हिडीओ देखील समोर आल्याचं समजतंय. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. मात्र, याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.  

तीन क्विंटल बटाटे आणि पंचवीस किलो टमाटे 

चोरीची ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली ( CCTV of Theft) आहे. तीन क्विंटल बटाटे आणि पंचवीस किलो टमाटे चोरणारे तीन चोरटे बोलेरो कारमधून आले. या चोरांनी किराणा दुकानातून पाच बोऱ्या म्हणजेच तब्बल तीन क्विंटल बटाटे आणि एक कॅरेट टमाटे, म्हणजेच तब्बल 25 किलो टॉमॅटोची चोरी केली. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांचा CCTV व्हिडीओ समोर आल्यानंतरही नेमके हे चोरटे कोण,  याबाबत अजून कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. हा चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social media) चांगलाच व्हायरल देखील झाला आहे.   

दुकानदाराचं म्हणणं आहे की...

ज्याच्या दुकानात ही चोरी झाली, त्या दुकानदाराचं म्हणणं आहे की, याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अजूनही तक्रारीची दखल घेतली नाही. बोलेरो गाडीतून आलेले हे चोर नेमके कोण होते, याबाबतही अजून माहिती समजू शकलेली नाही. याबाबत पोलिसांनी देखील माहिती दिली आहे. याबाबतची तक्रात दुकानदाराकडून मिळाली आहे, मात्र याबाबत अजून कोणतीही गुन्हा दाखल केला नसल्याचं सांगितलं गेलं. 

चोरटे बोलेरो घेऊन आले आणि...

समोर येणाऱ्या माहितीनुसार किशन कुमार असं या किराणा दुकानदाराचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या दुकानाबाहेर पोत्यांमध्ये बटाटे आणि टमाटे ठेवले होते. रात्री दुकान बंद करून सर्वजण आपापल्या घरी झोपले होते. अशात साधारण मध्यरात्री 12 च्या सुमारास अज्ञात चोरटे बोलेरो घेऊन आले. चोरटयांनी टोमॅटो आणि बटाटे घेऊन पोबारा केला.  व्हायरल होणारा व्हिडीओ 2 नोव्हेंबरचा असल्याचं समजतं.  

सदर, हैराण करणारी चोरीची घटना ही उत्तरप्रदेशातील मिर्झापूरची आहे. दुकानदार किशन कुमार यांचं कला पोलीस चौकीअंतर्गत येणाऱ्या सुगापाख खुर्द गावात किराणामालाचं दुकान आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

three people came in bolero and stole tomato and potato from grocery store