अभिनेता कमल हसन याच्या राजकीय पक्षाची आज घोषणा

अभिनेता दिग्दर्शक कमल हसनच्या राजकीय पक्षाची आज स्थापना आज  होणार आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खास आमंत्रण देण्यात आलयं, त्यासाठी आज अरविदं केजरीवाल मदुराईमध्ये येणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 11:12 AM IST
अभिनेता कमल हसन याच्या राजकीय पक्षाची आज घोषणा title=

 मदुराई : अभिनेता दिग्दर्शक कमल हसनच्या राजकीय पक्षाची आज स्थापना आज  होणार आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खास आमंत्रण देण्यात आलयं, त्यासाठी आज अरविदं केजरीवाल मदुराईमध्ये येणार आहेत.

 केजरीवालही भाषण करणार 

यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून कमल हसन आणि अरविंद केजरीवालही भाषण करणार आहेत. आपल्या पक्षाचा उद्देश आणि मुद्दे काय असतील हे यावेळी कमल हसन स्पष्ट करतील. तसचं  पक्षाच्या झेंड्यांचही अनावरण होणार आहे. 

नव्या युगाची सुरुवात

तसचं एका नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी ट्विटरवरून जनतेला कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. तत्पूर्वी आज कमल हसन यांनी रामेश्वरमध्ये जाऊन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या घरी जाऊन कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या कुटुंबियाशी बातचीत केली.