Transgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral

Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला 

Updated: Mar 13, 2023, 10:14 PM IST
Transgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral  title=
transgender couple pregnant kerala couple Zahhad Fazil Ziya Paval baby photoshoot and Video viral on social media trending now

kerala Transgender couple Pregnant baby Video : केरळमधील ट्रान्सजेंडर कपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने (Tranmale) आपल्याला बाळा जन्म दिला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. या कपलने सोशल मीडियावर बेबी बंपसोबत फोटो शेअर केले. अखेर त्याचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झाले. त्यांचा घरात नवा पाहुण्याचे आगमन झाले. प्रत्येकाला उत्सुकता होती की ते बाळ दिसायला कसे असेल...आज बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

'नजर नाही लागो!'

या जोडप्याने निर्णय घेतला आहे की, त्यांचं बाळ मोठं झालं की आपलं  Gender ठरवणार. जिया आणि जाहदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) बाळासोबतच क्यूट फोटोशूट शेअर केलं आहे. (kerala trans couple Pregnant baby Zahhad Fazil Ziya Paval photoshoot and Video viral on social media trending now)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Millennium TV (@millennium_tv)

बाळाची चाहुल लागल्यावर प्रत्येक कपलसाठी हे सर्वात अनमोल क्षण असतात. हे क्षण प्रत्येक जण आपल्या परीने जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कपलनेही त्यांचा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून जपून ठेवत आहेत. त्यांनी नुकतचं बाळासोबत क्यूट फोटोशूट केलं. 

गुलाब आणि फुलांच्या पाकळ्यांबरोबर लाल रंगाचे कपडे घालून त्यांचे हे फोटो फारच अप्रतिम दिसतं आहेत. बाळाचेही अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ziya Paval (@paval19)

महिलादिनी बाळाचं बारसं!

महिला दिनी या कपलने बाळाचं नाव ठेवलं. यावेळी बाळासोबत आई वडिलांचा लूक एकदम सिंपल पण एलिगंट दिसतं होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ziya Paval (@paval19)

दीर्घ प्रतीक्षेनंतर या दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. बाळासोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांचा चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो. दरम्यान बाळाला मिल्क बँकच्या (Milk Bank) माध्यमातून ब्रेस्ट फिडिंग करण्यात येतं आहे. शस्त्रक्रियेनंतर जाहदने आपले ब्रेस्ट काढून टाकले. पण गर्भाशय आणि काही अवयव हे महिलेचेच असल्याने गर्भधारणेत त्याला काही अडचण आली नाही.