Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष

Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?  

Updated: Feb 16, 2023, 10:53 AM IST
Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष title=
Trending Video Bharjari shalu mehndi on hands Instead of the wedding hall the bride arrived directly College exam Viral Video on Social media

Trending Bride Viral Video : लग्नाचा (Wedding video) सिझन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही नवरदेव आणि नवरीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लग्नातील नववधू आणि नवरदेवाची (Bride and groom video) गाण्यावर एण्ट्री असो किंवा जिजा सालीचे (Jija Sali video) व्हिडीओ असो...नेटकऱ्यांना हे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. नुकताच एक लग्न झालेल्या कपलने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा (first night video) व्हिडीओ शेअर केला आणि व्हायरल ( Viral Video) झाला ना राव तो...अनेक नेटकऱ्यांनी असा व्हिडीओ (Trending Video) शेअर केल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. पण दुसरीकडे एका अजून नववधूने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या त्या कृतीमुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 

भरजरी शालू, हातांवर मेहंदी..!

लग्नाचा दिवस ...सगळीकडे लगीनघाई.., सुंदर भरजरी शालू, हातांवर मेहंदी, बांगड्या, केसात गजरा आणि दागिनी घालून नववधू (Bride Viral Video) लग्नासाठी तयार झाली...गाडी बसून ही सुंदर नवरी निघाली खरी पण...ही गाडी लग्नमंडपात न जाता ती थेट एका कॉलेजमध्ये पोहोचते...आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ती इथे काय करतेय...तुम्ही पुढे व्हिडीओ पाह म्हणजे कळेल तुम्हाला...

नववधूचं हटके कृत्य

गाडीतून उतरताच नववधू पांढऱ्या रंगाचा मेडिकलचं अपरन घालते आणि गळ्यात स्टेथोस्कोप...आता तुम्हाला कळलं का ही नववधू मेडिकल स्टुडंट आहे.  लग्नाचा मुहूर्त आणि प्रॅक्टिकलची तारीख एकाच दिवशी आल्यामुळे नववधू कॉलेजमध्ये पोहोचली. तिला कॉलेजमध्ये बघून तिचे सगळे मित्र मैत्रीणी तिचं टाळ्या वाजून स्वागत करतात. (Trending Video Bharjari shalu mehndi on hands Instead of the wedding hall the bride arrived directly College exam Viral Video on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आईला घट्ट मिठी मारते

जसं तिचं प्रॅक्टिकल संपत ते बाहेर येते तिची आई वाट पाहत असते...आईला पाहून नववधू धावत आईला जाऊन घट्ट मिठी मारते. तिची परीक्षा कदाचित चांगली गेली असणार आणि आता ती लग्न मंडपात जाणार त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरील _grus_girls_  नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवरीचं हे हटके कृत्य पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.