TVS ची नवी बाईक स्टार सिटी प्लस लाँच

जाणून घ्या फिचर्स

 TVS ची नवी बाईक स्टार सिटी प्लस लाँच  title=

मुंबई : दुचाकी आणि तीन चाकी वाहने बनवणाऱ्या टीवीएस मोटर कंपनीने उत्सवाचं औचित्य साधून नवीन मोटर सायकल लाँच केली आहे. स्टार सिटी प्लस असं या बाइकचं नाव असून त्याची किंमत 52,907 रुपये आहे. 110 सीसी इंजिनचे असलेल्या या मोटरसायकलमध्ये ड्युअल दोन दर्पण तसेच सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग प्रोद्योगिक (एसबीटी) देण्यात आलं आहे. 

एसबीटीच्या अंतर्गत संयुक्त ब्रेकिंग प्रणाली देण्यात आली आहे. ज्यामध्ये फ्रंट आणि रिअर ब्रेक दोन्ही एकत्रच देण्यात आले आहे. टीवीएस मोटर 110 सीसी श्रेणी अशी सर्व्हिस देणारी ही पहिलीच कंपनी आहे. या अगोदर ऑगस्टमध्ये टीवीएसने चेन्नईमध्ये नवीन बाइक लाँच केली होती. 110 सीसी मध्ये लाँच केलेल्या या बाईकचा लूर हिरोच्या स्प्लेंडर सारखा आहे. तसेच इंजिन क्षमता आणि मायलेजच्या बाबतीत ही बाइक बाजारात असलेल्या अनेक बाइकला टक्कर देत आहे. कमी किंमत आणि उत्तम मायलेज असलेल्या या बाइक कंपनीने 25 ते 35 वयोगटातील तरूणांना लक्षात घेऊन ही तयार केली आहे. 

tvs radeon 110 cc motorcycle launched at priced rs 48,400

110 सीसी क्षमता असलेल्या या बाइकला TVS Radeon नाव दिलं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या बाइकला आकर्षक किंमती ठेवल्या आहे. या बाइकची दिल्लीतील एक्स शोरूमची किंमत 48,400 रुपये आहे. 

tvs radeon 110 cc motorcycle launched at priced rs 48,400

टीवीएसने नवीन बाइक Radeon ला खास करून तरूणांना विचारात घेऊन लाँच करण्यात आली आहे. कंपनीची अशी आशा आहे की TVS Radeon छोट्या शहरांत आणि ग्रामीण भागातील तरूणांना आवडेल.