डेल्टा प्लसचा धोका, केंद्र सरकारने 'या' तीन राज्यांना केले अलर्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना देशात नवे संकट उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचा ( Delta Plus) धोका वाढला आहे.  

Updated: Jun 22, 2021, 09:21 PM IST
डेल्टा प्लसचा धोका, केंद्र सरकारने 'या' तीन राज्यांना केले अलर्ट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना देशात नवे संकट उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचा ( Delta Plus) धोका वाढला आहे. राज्यात सहा जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण सापडले आहेत. आता केंद्र सरकारने डेल्टा प्लसचा (Delta Plus Variant) धोका लक्षात घेऊन देशातील तीन राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देताना अलर्ट केले आहे. हा व्हेरियंट अंत्यत धोकादायक आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्यावर भर द्या, असे निर्देश केले आहेत.

केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांत अर्थात केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला (Maharashtra,  Kerala, Madhya Pradesh) पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे सांगत हे पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशला डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत सल्ला दिला आहे. डेल्टा प्लस जिच्यामध्ये जिथे जिथे सापडेल तिथे ताबडतोब नियंत्रित आणण्यासाठी उपाययोजना तात्काळ करा. टेस्टिंग वाढवा आणि ट्रॅकिंगवर भर द्या तसेच लसीकरणावर भर द्या आणि ते करुन घ्या, असा सल्ला दिला आहे. 

दरम्यान, याआधी महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल येथे दिली.

दरम्यान, कोरोनानंतर (Coronavirus) आता निपाहचा (Nipah) धोका वाढला आहे. महाराष्ट्र राज्यातल्या वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच निपाह व्हायरस सापडला आहे. हा नवा उडता धोका निर्माण झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच वटवाघळांमध्ये निपाह हा खतरनाक व्हायरस सापडला आहे. (Nipah virus found in  in Maharashtra) पुण्यातल्या NIV नं केलेल्या संशोधनातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. वटवाघूळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह व्हायरस सापडला आहे. महाबळेश्वरमधल्या एका गुहेतल्या वटवाघूळांमध्ये निपाह आढळला. (Nipah virus found in two bat species in Maharashtra)