Shocking News : उत्तर प्रदेशातल्या (UP News) हदरोईमध्ये गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Blast) स्फोटामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाच्या घरातच हा स्फोट झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या एक दिवस आधी सिलेंडरचा स्फोट झाल्याने नवरीची आई आणि काकूचा जिवंत जाळून मृत्यू झाला आहे. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांसाठी जेवण बनवण्यासाठी मुलीचा आई आणि काकी स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यानंतर काकूचा पाय लागून गॅस सिलिंडर पडला आणि त्याची पिन बाहेर आली आणि गॅस गळती सुरु झाला. या गॅस गळतीमुळे लगेचच आग लागली. या आगीत मुलीची आई आणि काकू गंभीररित्या भाजल्या. त्यांना वाचवण्यासाठी आलेले काही लोकही भाजले. या भीषण अपघातानंतर मुलीवर शोककळा पसरली आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील लगीनघरात या अपघाताने शोककळा पसरली. घरात मुलीच्या लग्नाच्या तयारीत असलेल्या आई आणि काकू पाहुण्यांसाठी चहा बनवायला गेल्या. मात्र गॅस गळती झाल्याने गॅस सिलिंडरने पेट घेतला. माचिस पेटवताच आग भडकली. दोघींनीही तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. गॅस सिलिंडरच्या पाईपमध्ये पाय अडकल्याने दोघेही खाली पडल्या. दोघांनाही आगीच्या ज्वाळांनी वेढलेले पाहून लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जण गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हरदोईच्या नीर गावात राहणारे संजीवसिंग सोमवंशी यांची मुलगी राखी हिचे लग्न दुलारपूर येथे होणार होते. रविवारी राखीची वरात येणार होती. त्यासाठी घरात लग्नाचे विधी सुरू होते. संपूर्ण घर पाहुण्यांनी सजले होते. जवळचे नातेवाईकही घरी आले होते. मात्र लग्नाच्या आनंदात एका घटनेमुळे मीठाचा खडा पडला. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातील महिला स्वयंपाक करत होत्या. नातेवाईक घराच्या अंगणात आणि इतर खोल्यांमध्ये होते. स्वयंपाकघरात दोन सिलिंडर आणि एका वीटभट्टीवर जेवण बनवले जात होते.
संजीव यांची पत्नी मंजू या पाहुण्यांसाठी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यावेळी राखीची काकी शर्मिला या देखील मंजू यांच्या मदतीसाठी स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरात 8 ते 10 महिला आधीच होत्या. कोणी भाजी शिजत होते, कोणी पुर्या तळत होते. त्यावेळी शर्मिला यांचा पाय सिलिंडरच्या पाईपमध्ये अडकला आणि त्या खाली पडली. सिलिंडर चालू होता तितक्यात त्याची पिन बाहेर आल्यावर गॅस बाहेर पडू लागला. गॅस बाहेर पडताच आग स्वयंपाकघरात पसरली. आग लागताच धावपळ सुरु झाली. सगळ्यांची स्वयंपाकघराबाहेर पडण्यासाठी घाई सुरु झाली.
स्वयंपाकघरात भीषण आग लागली होती. कसेबसे काही लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र मंजू आणि शर्मिला या आत अडकल्या होत्या. दोघांनीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाय सिलिंडरच्या पाईपमध्ये अडकला होता. दोघेही तिथेच पडल्या होत्या. माझी पत्नी आणि वहिणी माझ्यासमोर भाजल्या आणि मी काहीच करू शकलो नाही, असे संजीवसिंग सांगितले.