लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र नाथ पांडे यांचे भाऊ जीतेंद्र नाथ पांडे यांची सून अमृता पांडे या काँग्रेसमध्ये जाणार आहेत. प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. निवडणुकीच्या आधी अनेक नेते दुसऱ्या पक्षामध्य़े प्रवेश करत आहेत. तर दुसऱ्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या नातेवाईंकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.
याआधी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता विखे पाटील हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची आता चर्चा आहे.