मिठीत घेतल्यावर पत्नीला गोळी मारली अन्...; तिचा काटा काढताना त्याच्याच खेळ संपला

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा सगळा हत्येचा थरार घडला आहे. या घटनेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गावात येऊन तपास सुरु करत गावकऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 15, 2023, 11:58 AM IST
मिठीत घेतल्यावर पत्नीला गोळी मारली अन्...; तिचा काटा काढताना त्याच्याच खेळ संपला title=

UP Crime : गुन्हेगारीच्या (Crime News) अनेक विचित्र घटना आजवर तुम्ही ऐकल्या वाचल्या असतील. पण उत्तर प्रदेशात घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पती पत्नीचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पतीने झाडलेल्या एकाच गोळीत दोघेही मृत्यूमुखी पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र एकाच वेळी दोन जणांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

मुराबादच्या खानपुर गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पत्नीसह स्वत:वर गोळी झाडून हत्या केली आहे. नवऱ्याने बायकोला मिठी मारली. पत्नीच्या पाठीत पिस्तुलाने गोळी झाडली. गोळी पत्नीच्या अंगातून पतीच्या छातीत अडकली. या धक्कादायक घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. मेहुणीच्या लग्नात मोबाईल हरवल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने हा सर्व प्रकार घडल्याटे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बुधवारी पहाटे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे.

खानपुर गावातील अनिक सिंग पत्नी सुमन आणि चार मुलांसह राहत होते. अनिक सिंगची मोठी मुलगी 17 वर्षांची आहे तर तिन्ही मुले लहान आहे. अनिक सिंग हे मजुरीचे काम करायचे आणि घर चालवायचे. काही वर्षांपूर्वी अनिक सिंगने भरपूर पैसे जमा करुन अँड्रॉइड फोन घेतला होता. 10 दिवसांपूर्वी अनिक सिंग हे आपल्या कुटुंबासह मेव्हणीच्या घरी लग्नासाठी गेले होते. मात्र घरी परतल्यावर त्याचा मोबाईल हरवला होता. मोबाईल हरवल्याच्या मुद्द्यावरून पती पत्नीमध्ये वाद होऊ लागला. त्यानंतर हे प्रकरण रोजच्या भांडणापर्यंत पोहोचलं. पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होते पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. 

मात्र या भांडणावरुन अनिक सिंग प्रचंड दुःखावला होता. शेवटी नेहमीची कटकट संपवण्याचा अनिक सिंगने निर्णय घेतला. अनिक सिंगजवळ एक गावठी कट्टा होता. त्याने मंगळवारी रात्री पत्नीला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर कट्टा ठेवून गोळी झाडली. गोळी सुमनच्या शरीरात घुसली आणि मग अनिक सिंगच्या छातीत जाऊन घुसली. या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. मुलांनी आजूबाजूच्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.