10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य

Crime News : मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या वडिलांनी पैसे दिल्यानंतरही आरोपी पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे

आकाश नेटके | Updated: May 20, 2023, 12:54 PM IST
10 लाख रुपये आण, तेव्हाच...' हनिमूनसाठी गेलेल्या पतीचे पत्नीसोबत किळसवाणं कृत्य title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथील एका विवाहित महिलेच्या वडिलांनी पोलीस (UP Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जावई हुंड्यासाठी मुलीचा छळ करत असल्याचा आरोप करत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलीला घरातून हाकलून देण्यात आल्याचेही मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सासू आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला दोन महिने उलटूनही पतीने शारीरिक संबंध ठेवल्याचा नसल्याचा आरोपही मुलीने केला आहे. या सर्व प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी हे प्रकरण पाच लाखांवर मिटवले. मात्र त्यानंतरही हनिमूनसाठी गेलेल्या पती पत्नीमध्ये काहीच घडलं नाही, असाही आरोप मुलीने केला. याउलट आरोपी पतीने पत्नीसोबत हादरवणारं कृत्य केले आहे.

6 फेब्रुवारी 2023 रोजी पीडित मुलीचे लग्न बदाऊनमधील एका तरुणासोबत झाले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात 20 लाख रुपये खर्च केले होते. मुलीसोबत तिच्या कुटुंबियांनी 15 लाखांचे मौल्यवान दागिनेही दिले होते. यानंतर पत्नीने तिच्या कुटंबियांकडे अजब तक्रार केली. लग्नाच्या दोन महिन्यांतरही पती आपल्या जवळ न आल्याचे मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितले. लग्नानंतर आम्ही हनिमून साजराच केला नाही, असे मुलीने सांगितले. नवरा माझ्यापासून अंतर ठेवून राहत आहे. याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर पती वारंवार उत्तर देणे टाळत होता. अशेच तीन महिने निघून गेले, असेही पीडिता म्हणाली. 29 मार्च रोजी घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या सासू-सासऱ्यांना सांगितला. मात्र त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही.

यानंतर काही दिवसांनी मुलगी तिच्या घरी आली. तिने पुन्हा आईला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर 12 एप्रिल रोजी पती तिला घेण्यासाठी पिलीभीत येथे आला. त्यावेळी मुलीच्या आईने जावयाकडे याबाबत विचारपूस सुरु केली. तुम्हाला कोणताही आजार असेल तर सांगा, त्यावर उपचार करता येतील. पती-पत्नीमध्ये अशाप्रकारचे अंतर योग्य नाही, , असेही मुलीच्या आईने सांगितले. यावर जावयाने केलेली मागणी ऐकून सासूच्या पायाखालची जमिनच सरकली. मला 10 लाख रुपये द्या तेव्हाच आम्ही हनिमूनला जाऊ अशी धमकी जावयाने दिली.  यानंतर सासरच्यांनी जावयाला पाच लाख रुपये दिले.

पैसे मिळाल्यानंतर दोघेही 7 मे रोजी दोघेही हनिमूनसाठी नैनितालला गेले. मात्र तिथेही पतीने हनिमून साजरा केला नाही, असा आरोप विवाहितेने केला. उलट पीडित महिलेचे पतीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. याबाबत जाब विचारला असता पतीने धक्कादायक उत्तर दिले. उरलेले पाच लाख रुपये घेऊन ये, मग आपण हनिमून साजरा करू. पैसे मिळाले नाही तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी पतीने दिली.

यानंतर पतीच्या वागणुकीला कंटाळून पुन्हा महिला 13 मे रोजी माहेरी आली. तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेने पिलीभीत पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.पोलिसांनी दोघांविरुद्ध  मारहाण, शिवीगा