Husband Runs Sex Racket At Home: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये या महिलेने, माझा पती घरात सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवतो असा आरोप केला आहे. या महिलेने पुरावा म्हणून एक व्हिडीओही पोलिसांना दिला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेच्या घरातील बेडरुममध्ये एक तरुण आणि तरुणी दिसत आहेत.
महिलेने केलेल्या दाव्यानुसार, तिने तिच्या पतीविरोधात यापूर्वीही अशी तक्रार केली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामध्ये संपूर्ण तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लखीमपूर खीरी जिल्ह्यात राहणारी अशफी खान पोलीस स्टेशनला पोहोचली. तिने पती शहनवाज सिद्दीकीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अशफीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती म्हणजेच शहनवाज घरात सेक्स रॅकेट चालवतो. अशफीने दिलेल्या माहितीनुसार शहनवाजने लग्नानंतर घरात सुरु केलेल्या या अश्लील उद्योगामुळे अनेकदा दोघांमध्ये वादही झाले आहेत. त्यामुळेच शहनवाजने पत्नीला माहेरी राहण्यासाठी पाठवलं.
अशफीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सेंधवा येथे तिचं सासरचं घर आहे. एकदा बाजारात असताना शेजाऱ्यांनी अशफीला माहिती दिली की त्यांच्या घरात एक तरुण आणि तरुणी आहे. अशफी लगेच घरी पोहोचली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. ती बरीच खटपट करुन घरात पोहोचली तर त्यांच्या घरातील बेडरुमवरील बेडवर तरुण-तरुणीने नको त्या अवस्थेत पडले होते. तिने या दोघांचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला.
अशफीने केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या बेडरुममध्ये असलेल्या मुलीची बाईकही घराबाहेर उभी होती. मी व्हिडीओ बनवत असताना शहनवाज आला आणि त्याने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा गळा पकडला आणि नंतर विटेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी माझी सुटका करुन तिथून पळ काढला, असा दावाही अशफीने केला.
अशफी आणि शहनवाज प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाल सिंह यांनी या महिलेने लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये तिने पती घरातच सेक्स रॅकेट चालवत असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु असून माहिती समोर आल्यानंतर आणि केलेले दावे खरे असल्याचे पुरावे मिळाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.