मोदींच्या आश्वासनातले १५ लाख न मिळाल्याने तरूणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता. 

Updated: Jun 9, 2018, 11:03 AM IST
मोदींच्या आश्वासनातले १५ लाख न मिळाल्याने तरूणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न title=

 नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या अश्वासनांवर अनेकांनी विश्वास ठेवला. पण, सत्ता आल्यावर मात्र या आश्वासनांची पूर्तता होत नल्याचे ध्यानात येताच एका तरूणाने चक्क स्वत:ला बँकेतच जाळून घेण्याचा प्रयत्न केला. घटना आहे, उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवल येथील. जरवलमधल्या इलाहबाद बँकेच्या शाखेत आलेल्या एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँक कार्यालयात एकच धावपळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता. 

बँक कर्मचाऱ्यांनी फेटाळली तरूणाची मागणी

पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मौजीलाला नावाचा हा तरुण सकाळी ११च्या सुमारास बँक कार्यालयात पोहोचला. बँकेत पोहोचल्यावर त्याने पंतप्रधान मोदींनी अश्वासन दिलेले १५ लाख रूपये आपल्याला मिळावेत अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांकडे केली. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तरूणाची मागणी फेटाळून लावताच तरूण आगतीक झाला. त्याने स्वत:जवळ असलेलेल पेट्रोल बँकेत शिंपडण्यास सुरूवात केली. तसेच, पेट्रोल शिंपडता शिपडता 'सर्वांनी बँकेतून बाहेर जा. मी बँकेला आग लावत आहे', अशी धमकी देण्यास सुरूवात केली.

बँकेला आग लावण्याचा प्रयत्न

दरम्यान, अचानक गुदरलेल्या या प्रसांगामुळे बँक कर्मचारी अवाक् झाले. तर, उपस्थित ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. या धवपळीत काहीजण जखमीही झाले. काही वेळात या तरुणाने बँकेले आग लावण्याचा प्रयत्न करू पाहिला. पण, त्यात त्याला यश आले नाही. दरम्यान, प्रकरणाची माहिती पोलिसांना समजली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने हजेरी लावत तरूणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. पोलिस अधिकारी अभय सिंह यांनी सांगितले की, आरोपी तरूणाची मानसिक स्थिती योग्य नाही. त्याच्या या कृत्याबाबत त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली आहे. या तरूणावर गुन्हा नोंद केल्याचेही पोलिसांनी सांगितले.