मुंबई : शेअर बाजारांमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. गेल्या दोन आठवड्यात मार्केट रेकॉर्ड करीत आहे. दरम्यान अनेक कंपन्यांमध्ये IPO ची स्पर्धा लागली आहे. ऑगस्ट महिन्यातील 20 दिवसातच 23 कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे (SEBI) अर्ज केले आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आयपीओ अर्ज बाजारातून 40 हजार कोटी रुपयांची रक्कम उभारण्यासाटी करण्यात आले आहेत. तसेच आधीच आठ कंपन्या आधीपासूनच बाजारात उतरल्या आहेत. त्या 18200 कोटी रुपये बाजारातून उभारतील.
या वर्षी 40 हून अधिक आयपीओ
यावर्षी 40 हून अधिक आयपीयोच्या माध्यमातून 70 हजार कोटी उभारण्यात आले आहेत. या कंपन्यांमध्ये अनेक स्टार्टअप सेक्टर आहेत. त्यात फायनान्शियअल टेक्नॉलॉजी, ई कॉमर्स, ऑनलाईन ट्रॅव्हल आणि सॉफ्टवेअर सर्विसेसचा सहभाग आहे. या आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यांचे म्हणणे आहे की, या वर्षी आयपीओची संख्या 100 च्या पार जाऊ शकते.
या कंपन्या बाजारात उतरण्यास तयार
अदानी ग्रुपची एफएमसीजी शाखा अदानी विल्मर आणि मुंबईची ऑनलाईन फॅशन आणि परिधान ब्रॅंड नायकाच्या नियंत्रणात असेलेली एफएसएन ई कॉमर्स आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. तसेच ली ट्रॅव्हल न्यूज टेक्नॉलॉजी, रेटगेन ट्रैवल टेक्नोलॉजी, तारसंस प्राडक्ट्स, पापुलर वेहीकल्स एँण्ड सविर्सिज, वीएलसीसी, सैप्पहायर फूड्स सारख्या कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत.