मोदी सरकारची रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी; PMO कार्यालयातून सूचना जारी

ज्येष्ठ उद्योगपती यांच्यावर मोदी सरकारची मोठी जबाबदारी

Updated: Sep 21, 2022, 03:38 PM IST
मोदी सरकारची रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी; PMO कार्यालयातून सूचना जारी title=
(फोटो सौजन्य : ANI)

PM-CARES : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे (TATA) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांच्यावर केंद्र सरकारने (modi government) मोठी जबाबदारी टाकली आहे. केंद्र सरकारकडून कोरोना (corona) काळात सुरु करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडच्या (PM CARES Fund) बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये (trustees) नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्यासह आणखी काही जणांची पीएम केअर्स फंडच्या (PM CARES Fund) विश्वस्तपदी (trustees) नेमणूक करण्यात आलीय. (Ratan Tata nominated as trustees of the PM CARES Fund said pmo office)

त्याचबरोबर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murty) यांचा सल्लागार गटात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO Office) गुरुवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah), केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि नवनियुक्त विश्वस्त उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी पीएम केअर्स फंडात योगदान दिल्याबद्दल भारतीयांचे कौतुक केले. बैठकीत निधीच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचाही समावेश करण्यात आला असून, त्याद्वारे 4 हजार 345 मुलांना मदत केली जात आहे. 

नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या आगमनाने पीएम केअर्स फंडाच्या कामाला एक नवीन दृष्टीकोन मिळेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस (former Supreme Court judge KT Thomas), माजी उपसभापती कारिया मुंडा (ormer deputy Lok Sabha speaker Kariya Munda) आणि उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची पीएम केअर फंडमध्ये विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आलीय. बैठकीनंतर ट्रस्टतर्फे सल्लागार गटात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. 

यामध्ये माजी कॅग राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murty), माजी इंडीकॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे सीईओ आनंद शाह यांचा समावेश आहे.