VIDEO : लग्नात ढसाढसा रडणाऱ्या नववधुसोबत असा वागला नवदेव

नवरदेवाचं वागणं सगळ्यांनाच धक्कादायक 

Updated: Aug 3, 2021, 11:50 AM IST
VIDEO : लग्नात ढसाढसा रडणाऱ्या नववधुसोबत असा वागला नवदेव title=

मुंबई : लग्नात अनेक पद्धती असतात ज्या विधीच्या रुपात नववधु आणि नवरदेव फॉलो करत असतात. या दरम्यान अनेकदा नवं दाम्पत्य भावूक होतात. असाच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये नववधु एका विधीकरता स्टेजवर बसली आहे. एक विधी सुरू असताना नववधु अतिशय भावूक झाली. नवऱ्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालणं ही प्रत्येक तरूणीसाठी खास गोष्ट असते. 

स्टेजवर बसणारी नववधु का रडू लागली 

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, नववधू स्टेजवर बसलेली दिसते आणि या दरम्यान दोन्ही पक्षांचे कुटुंब तिथे उभे आहेत. त्यानंतर नवरदेव मंगळसूत्र घेऊन तिथे पोहोचते. वधू खूप भावनिक बनते आणि हात जोडून रडू लागते. नवरदेव प्रथम वधूला मंगळसूत्र घालतो आणि नंतर तिच्या कपाळाचं चुंबन घेतो.

वराने मंगळसूत्र घालून पुसले अश्रू

नवरदेवाने मंगळसूत्र घातल्यानंतर वधू ढसाढसा रडू लागते. वधूला रडताना पाहून कुटुंबातील सदस्यानेही तिचे अश्रू पुसले. एवढेच नाही तर वराने तिला रडताना पाहिले, तिच्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले. काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप बघितला जात आहे. इन्स्टाग्रामवर त्याला 47 हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे.