मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात तरुणाच तोल बिघडला आणि घडला असा भयानक प्रकार, पाहा व्हिडीओ

त्या मुलींना नंतर हे कळून चुकलं असेल की, ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.

Updated: Dec 6, 2021, 01:43 PM IST
मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात तरुणाच तोल बिघडला आणि घडला असा भयानक प्रकार, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकाला लोकप्रिय व्हायचे असते. त्यात काही लोक प्रसिद्घ होण्यासाठी आणि आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी दाखवतात. त्यामुळे अनेकवेळा लोकांना त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि व्हूव्ज मिळतात. विशेषतः तरुणांमध्ये याची क्रेझ अधिक आहे. काही लोक लोकप्रियता मिळवण्यात यश मिळवतात, तर काही लोकांचा तो प्लॅन फ्लॉप ठरतो, ज्यामुळे ते दुसऱ्या लोकांसाठी एक हस्स्यास्पद उदाहरण बनतात.

असाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू येईल.

आपल्या सर्वांना माहित आहे की, सध्या प्रत्येकजण आपल्यातील कला दाखवण्यासाठी प्रयत्न करतात. नुकताच यासंबंधीचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगा सामील आहे जो स्पोर्ट्स बाईकद्वारे मुलींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटी असे काहीतरी घडते ज्यामुळे त्याच्यावरती सगळ्यांना हसण्याची वेळ येते. त्याच्यासोबत जो प्रकार घडला आहे, त्यानंतर तो कधीही स्टंट किंवा शो ऑफ करण्याचा प्रयत्न करत नाही हे मात्र नक्की.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, अनेक लोक त्यांच्या स्पोर्ट्स बाईकसह एका ठिकाणी जमा झाले आहेत. एक मुलगा मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपल्या जवळ बोलावतो आणि त्यांना आपल्या बाईकवर बसायला सांगतो. त्यानंतर त्या मुली देखील स्टाईलमध्ये त्याच्या बाईकवरती बसतात. परंतु त्या मुलींना नंतर हे कळून चुकलं असेल की, ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.

कारण स्टंट दाखवण्यासाठी हा तरुण जेव्हा आपली बाईक सुरू करतो, तेव्हा त्याचे नियंत्रण बिघडले आणि बाईक थेट जवळच उभ्या असलेल्या इतर बाईकवर जाऊन आदळते.

ट्विटरवर द डार्विन अवॉर्ड्स नावाच्या पेजवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कधी काढला आणि कुठे आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वापरकर्ते या व्हिडीओवर कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत. तरुणांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालू नये, असे सर्वांचे म्हणणे आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने सांगितले की, स्टंट करण्याच्या प्रक्रियेत लोक खरोखर त्यांच्या जीवाची पर्वा करत नाहीत. त्याचवेळी दुसऱ्या युजरने हा जीवघेणा स्टंट असल्याचे सांगितले.