मुंबई : Accident News : कधीकधी, थोड्या निष्काळजीपणामुळे, भीषण अपघात (Accident) होतात. दुचाकी किंवा स्कूटी चालवताना हेल्मेट (Helmet) घालणे आणि कार चालवताना सीट बेल्ट घालणे नेहमीच योग्य आहे. असे केल्याने अपघातात होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करता येते. सोशल मीडियावर एका मुलीसोबत झालेल्या भीषण अपघाताचा (Accident News) व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. लोक यापासून काहीतरी सल्ला घेऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. अलीकडेच, उत्तर प्रदेश पोलिसात (UP Police) तैनात सचिन कौशिकने ट्विटरवर एका मुलीसोबत झालेल्या अपघाताचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ यापूर्वी हैदराबाद शहर पोलिसांनी शेअर केला होता. यामध्ये, रस्त्यावर एक कार दिसत आहे आणि स्कूटी चालवणारी एक मुलगी तिच्या मागे दिसत आहे. मग गाडी अचानक वळल्यामुळे ती मुलगी कारवर आदळली आणि उडी मारताना पडली.
मात्र 900 रुपए में कुछ मिले ना मिले, ‘जीवन’ ज़रूर मिलता है।#WearHelmet #HelmetSavesLife #Accident
pic.twitter.com/VCypokvs4M— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) August 6, 2021
ही धडक इतकी जोरदार होती की ती मुलगी रस्त्यावर फेकली गेली आणि जोरदार आपटली. केवळ हेल्मेटमुळे या मुलीचा जीव वाचला. जर तिने डोक्यावर हेल्मेट घातले नसते तर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असती. सचिन कौशिकने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जर तुम्हाला फक्त 900 रुपयांमध्ये काहीही मिळात नाही, मात्र तुम्हाला नक्कीच 'जीवन' मिळेल.
आतापर्यंत हा व्हिडिओ 54 हजारांहून अधिक लोकांनी हा पाहिला आहे.