व्हिडिओ : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुण घुसला आणि...

ही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात

Updated: Oct 17, 2019, 05:04 PM IST
व्हिडिओ : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुण घुसला आणि...

नवी दिल्ली : नवी दिल्लीत असलेल्या प्राणीसंग्रहालयात एका तरूण थेट सिंहाच्या पिंजऱ्यात उतरल्याची घटना आज घडली. सिंहाच्या पिंजऱ्यात एक तरूण उतरला. त्याला इतर पर्यटकांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणाचंही न ऐकता तो सिंहाच्या पिंजऱ्यात उतरला आणि सिंहासमोर जाऊन काही काळ बसून बसून राहिला. त्यानंतर हा तरूण सिंहाशी काही तरी बोलत असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर हा तरूण काही काळ सिंहासमोर आडवा झाला. त्यानंतर सिंहाने या तरूणाचा अगदी जवळ येऊन अंदाज घेतला.

सिंह जवळ आल्यानंतर घाबरून उभ्या राहिलेल्या या तरूणाची सिंहाशी झटापट झाली.... आणि बघेकऱ्यांच्या काळजात धस्स् झालं... त्यांनी आरडा-ओरडी करत एकच गलका केला.

मात्र, हा प्रकार सुरू असल्याचं पाहून सुरक्षारक्षकांनी तातडीने सिंहाच्या पिंजऱ्यात धाव घेतली आणि सिंहाला दूर पिटाळून या तरूणाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. यासाठी त्यांना मोठी कसरतही करावी लागली. पहिल्यांदा सिंहाचं लक्ष दुसरीकडे वळवून त्याला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं.

ही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात. या तरुणाचं नाव रेहान खान असल्याचं समजतंय. तो बिहारचा रहिवासी असल्याचं समजतंय. आपण बेरोजगार असून आत्महत्या करण्याच्या हेतूनं सिंहाच्या पिंजऱ्यात घुसल्याचं तरुणानं म्हटलं. परंतु, हा तरूण मानसिकरित्या आजारी असल्याचं दिसून आलंय. गुरुवारी दुपारी १२.०० वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली.

उल्लेखनीय म्हणजे, याआधीही २०१४ मध्येही दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात अशाच पद्धतीनं एका वाघाच्या पिंजऱ्यात घुसला होता. त्यावेळी, सुखरुप बाहेर येण्यात त्याला अपयश आलं आणि त्याचा मृत्यू झाला.