स्विमिंग पूलमध्ये ओले कपडे झटक्यात काढण्याची ट्रिक तुम्हाला माहित आहे? पाहा तरुण-तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

बऱ्याचदा आपल्याला ओले कपडे अंगावरुन काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 

Updated: Aug 31, 2021, 03:15 PM IST
स्विमिंग पूलमध्ये ओले कपडे झटक्यात काढण्याची ट्रिक तुम्हाला माहित आहे? पाहा तरुण-तरुणीचा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : या जगात हूशार लोकांची कमतरता नाही. काही लोकं खरोखरच खूप हूशार असतात, तर काहींची हूशारी पाहून त्यांना काय म्हणावे हेच आपल्याला सूचत नाही. सध्या सोशल मीडियामुळे तर आपल्याला लोकांचे असे कारनामे पाहायला मिळतात. तर या प्लॅटफॉर्ममूळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोकं ठरवून असे व्हिडीओ बनवतात आणि त्याला शेअर करतात. या व्हिडीओजना पाहून अनेक यूजर्सचे देखील मनोरंजन होते. काही व्हिडीओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ खरोखरच आपल्या फायद्याचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दररोजच्या होणाऱ्या एका मोठ्या गोष्टीवर आपल्याला सोप्या पद्धतीने सोल्यूशन मिळालं आहे.

बऱ्याचदा आपल्याला ओले कपडे अंगावरुन काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण ओले कपडे आपल्या अंगाला चिकटतात आणि त्यामुळे ते लगेच काढता येत नाही. तर काही वेळा बाहेरील कपडे काढताना त्यात आपले अंत्यवस्त्र किंवा आतील कपडे देखील निघून येतात. तर काही वेळा आपण स्वीमिंगपूलमध्ये जाण्यापूर्वी बाहेर पाण्याने अंघोळ करतो आणि मग पूलमध्ये जातो, तेव्हा देखील आपल्याला ओले कपडे काढणे खूप मेहनतीचे काम होते

परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे हे काम आता आरामात आणि सोप झालं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विमिंग पूलसमोर उभी असलेली एक महिला तिचा टी-शर्ट काढत आहे. पण तेवढ्यात एक मुलगा मागून येतो आणि पूलमध्ये उडी मारतो. आणि तो ओले कपडे काढण्याची एक यूक्ती आपल्याला दाखवतो. तो पाण्यात आत जातो आणि जास्त मेहनत न घेता ओला टी-शर्ट काढतो.

त्याला पाहून, ती महिला देखील तलावात उडी मारते. तेव्हा तो तरुण त्याच्या युक्तीचा वापर करून त्या महिलेचे देखील ओले टी-शर्ट काढतो.

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही ट्रिक पाहून भारी वाटेल. कारण ही ट्रीक खरोखरच खूप सोपी आणि आश्चर्य वाटणार नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर JABiR KHAN SiNGAriYA नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे

त्याचबरोबर 2 लाखांहून अधिक लोकांना तो आवडले आहे. एवढेच नाही, तर बरेच लोक ही या व्हिडिओवर कमेंट देखील करत आहेत.