'स्टार कपल' विराट-अनुष्कानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट

सध्या सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा... 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 20, 2017, 09:30 PM IST
'स्टार कपल' विराट-अनुष्कानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट title=

मुंबई : सध्या सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा... 

लग्न आणि हनीमूननंतर आता विराट - अनुष्का भारतात परतलेत. दिल्लीत विराटच्या घरी या जोडप्याचं जोरदार स्वागत झालं.  

यानंतर विराट आणि अनुष्कानं बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विराट-अनुष्कासोबतचा फोटो शेअर केलाय. 

यावेळी नरेंद्र मोदी यांनी विराट - अनुष्काला एक छोटं गिफ्ट देऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्यात. 

इटलीमध्ये लग्न समारंभ पार पडल्यानंतर आता दिल्लीच्या ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये २१ डिसेंबर रोजी विराट-अनुष्काच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलंय. या रिसेप्शनचं आमंत्रण देण्यासाठी 'विरुष्का'नं पंतप्रधानांची भेट घेतलीय.

'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलंय... तर २६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.