Crime News : तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यातील एका व्यक्तीला त्याच्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांमध्ये क्रिकेटवरून (Cricket Fight) वाद होत होते, त्यानंतर आरोपी मित्राने मित्राला बॅट मारहाण करत त्याची हत्या केली. आरोपी मित्र रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स (MI) चा फॅन होता. तर दुसरा मित्र हा विराट कोहली (Virat Kohli) आणि आरसीबीचा (RCB) फॅन होता. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद पेटला.
ही धक्कादायक घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली. दोन मित्र हे मल्लूरजवळील सिडको औद्योगिक वसाहतीमध्ये गेले असताना वाद पेटला. दारू पित करताना दोन्ही मित्रांनी क्रिकेटवर चर्चा केली. मंगळवारी दारूची पार्टी सुरू असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राने आरसीबी आणि विराट कोहलीची खिल्ली उडवली. त्यानंतर आरोपीला राग अनावर झाला.
आणखी वाचा - हुड्डा आता तर मी निघून जाईल..., Virat Kohli असं का म्हणाला? Video व्हायरल
आरोपीला (virat kohli rcb fan) तोतरं बोलत असल्याने मित्र त्याची खिल्ली उडवायचा. एक दिवस मित्राने आयरसीबीची तुलना आरोपीच्या तोतरं बोलण्याची केली. त्याचबरोबर विराटच्या नावावरून देखील चिडवलं. त्यावेळी आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने नको ते कृत्य केलं. मित्राच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने त्याच्यावर दारूच्या बाटलीने हल्ला केला आणि क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केली.
मित्राचा काटा काढल्यानंतर आरोपीने मित्राला सिडको औद्योगिक वसाहतीच्या मोकळ्या जागेवर फेकून दिलं. त्यानंतर सकाळी मित्राचा मृतदेह आढळला. त्यावेळी पोलिसांनी सर्व बाजूने चौकशी सुरू केली. पोलिसांनी फोन रेकॉर्ड चेक केल्यावर पोलिसांना आरोपीवर संशय आला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.