मुंबई : असं म्हणतात की लोकांची विचारसरणी चांगली असेल तर त्यांना वाईट परिस्थितीतही आनंदी राहण्याचा मार्ग सापडतो. जेव्हा एखाद्या मुलाचं मुलीशी लग्न ठरवलं जातं, तेव्हा ते नक्कीच एकमेकांमधील ते गुण शोधतात, जे त्यांना खूप आवडतात. मात्र, अनेक वेळा तसे होत नाही. अशा परिस्थितीत जोडीदाराच्या आनंदातच आनंदी राहावे लागते. लग्नात वराला वधूपेक्षा उंच असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, परंतु ही परिस्थिती बदलली तर लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलू लागतात.
जर एखाद्या उंच वधूला लहान वर भेटला तर चर्चांना उधाण येतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंटरनेटवर एका लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर सात फेरे घेताना दिसत आहेत. वधू मागे-मागे चालत आहे, तर वर पुढे चालत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला वर दिसत नाही, मात्र काही सेकंदांनंतर व्हिडिओमध्ये वर दिसू लागतो.
दोन फूट उंचीचा एक व्यक्ती उंच वधूसोबत सात फेरे घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सात फेरे घेत असताना फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत आहेत, तर त्यांचे कुटुंबीय आणि पंडीत त्यांच्याभोवती उभे आहेत. वराने निळ्या रंगाचा सूट घातला आहे, तर वधू लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.