मुंबई : आपण जेव्हा आपल्या मित्रांसह किंवा कुटूंबियांसह हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता, तेव्हा आपण जेवण खाल्यानंतर बिल मागवतो आणि वेटरकडे बिल देतो. बिल आल्यानंतर आपण जेवणाचे बिल तर भरतोच, परंतु आपण त्यामधील काही पैसे आपण वेटरला टिप म्हणून देतो. आता ही टिपची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या घरात टीव्ही किंवा चित्रपट, मित्र, वडील यांच्याकडून ऐकले आहे की, असे वेटरला टिप दिली जाते म्हणून आपण ती टिप देतो. पण तुम्हाला हे माहित आहे का? की टिप देण्याची पद्धत कशी सुरू झाली? त्यामागची कथा काय आहे? टिपिंग संस्कृती कशी बनली, एक परंपरा बनली? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
जेवण जेवल्यानंतर टिप देण्याची परंपरा ब्रिटीशांनी सुरू केली होती. ही प्रथा सुमारे साला 1600 काळात सुरु झाली आहे . योगायोग म्हणजे या दशकात ब्रिटीशांनी भारताच्या मातीवर पाऊल ठेवले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या वर्षात झाली आणि ती साधारणपणे ब्रिटिशांच्या भारतात येण्याशी संबंधित होती. एका मीडिया वृत्तानुसार, 1600मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना चांगली सेवा दिल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्कम देण्यास सुरुवात केली गेली. त्याची सुरुवात कर्मचार्यांच्या कौतुकासाठी केली गेली. नंतर तो एक ट्रेंड बनला.
तसे पहाता टिप देण्याच्या या गोष्टीला अनेक कथा सांगितल्या जातात. या दुसऱ्या कहाणीत असे सांगितले जाते की, foodwoolf वेबसाइटने 18 व्या शतकापर्यंत अमेरिकेत टिपिंगची सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशनमधील प्रोफेसर मायकल लिन यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत याची सुरुवात मोठ्या क्लासच्या लोकांनी सुरु केली होती. त्यावेळेस समाजातील मोठी, उच्च शिक्षित लोकं स्वत:चा क्लास दाखवण्यासाठी कामगार आणि सेवा देणाऱ्या वर्गाला अशी टिप द्यायचे.
परंतु लिन यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, याची सुरुवात फक्त 17 व्या शतकात ब्रिटनमध्ये झाली होती. जेव्हा विशेषत: मद्यपान करणारे लोकं वेटर किंवा नोकरांना टिप्स देत असत. कारण ते मद्यपान करणाऱ्या लोकंना दारु ओतून देतात किंवा त्यांचे ग्लास सांभाळतात.
ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार 1706 साली 'टीप' हा शब्द प्रथम वापरला गेला. असेही म्हटले जाते की, TIPचे फूल फॉर्म To Insure Promptitude आहे. म्हणजेच, टीप असे सूचक आहे की, यामुळे टिप देणार्यास व्यक्तीला स्पेशल, चांगली आणि तत्पर सेवा दिली जाईल. प्रोफेसर लिन यांच्या रिसर्चमध्येसुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे. लेखक आणि शब्दकोषशास्त्रज्ञ सॅम्युएल जॉन्सन यांनी लिहिले आहे की, 18 व्या शतकातील कॉफी हाऊसमध्ये एक टिपीं जार होते. ज्याचा वापर इंग्लंडमध्ये सर्वत्र केला जाऊ लागला, याला बहूतेक लोकं शॉर्टमध्ये टिप म्हणून बोलू लागले. ज्यामुळे हा शब्द सर्वत्र ओळखू लागला.
1764 मध्ये, जेव्हा ब्रिटनमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पबमधील कर्मचार्यांना भत्ता देणे सामान्य झाले, तेव्हा उच्चभ्रूंनी टिप्स संपविण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान लंडनमध्ये बरीच खळबळ उडाली होती. 1904 मध्ये अमेरिकेतील पत्रकारांनीही या टिपींग संस्कृतीचा निषेध केला. त्यांच्या मते टिप देण्याची परंपरा एक प्रकारची गुलामी दाखवते. अमेरिकन संस्कृतीत याचा या आधी समावेश नव्हता.
त्यानंतर जॉर्जियामध्ये अमेरिकेची अँटी-टिपिंग सोसायटी तयार झाली आणि पुढच्या दशकात वॉशिंग्टनसह अमेरिकेच्या 6 राज्यांनी टीपिंग-विरोधी कायदे मंजूर केले. परंतु त्यानंतर, 1926 मध्ये अमेरिकेच्या सर्व राज्यांत टीपिंग-विरोधी कायदे रद्द केले गेले.
सामान्य संकल्पना अशी आहे की, बहुतेक भारतीय उदार मनाने टिप देत नाही, त्यांना ते परवडत सुद्धा नाही.तसे पहाता टीप देणे आपल्यावर अवलंबून असते. तुम्हाला ही टिप जबरदस्ती देण्यासाठी कोणीही भाग पाडू शकत नाहीत. जेव्हा रेस्टॉरंट्सने बिलात सर्व्हिस शुल्काची भर घालण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकांनी काही प्रमाणात टिप देणे बंद केले. सीबीडीटीने असे गृहित धरले आहे की, सर्व रेस्टॉरंट्स सेवा शुल्काद्वारे मिळणारी रक्कम कर्मचार्यांना देत नाहीत. म्हणूनच त्यांनी बिलावर बारीक नजर ठेवायला सुरवात केली.
5 वर्षांपूर्वी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Department of Consumer Affairs) हे स्पष्ट केले होते की, रेस्टॉरंट बिलातील सेवा शुल्कहे पर्यायी आहे, अनिवार्य नाही. म्हणजेच, आपल्याला रेस्टॉरंटची सेवा आवडत नसेल तर आपण सेवा शुल्क देण्यास नकार देऊ शकता. रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज आकारला जातो. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार जर एखाद्या ग्राहकास सेवा शुल्क म्हणून चुकीच्या मार्गाने पैसे भरण्यास भाग पाडले गेले असेल, तर तो कंज्यूमर फोरममध्ये तक्रार करू शकतात.