असंही असतं होय.... 1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या यामागचं Secret

आपणही असं कित्येकदा लिहिलं असेल, पण कधी याचा विचार केला आहे का की हे असंच का लिहितात.... ?

Updated: Mar 11, 2022, 11:23 AM IST
असंही असतं होय.... 1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या यामागचं Secret  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : रोजच्या आयुष्यात असे कित्येत प्रसंग येतात जेव्हा आपण अशा काही गोष्टींचा वापर करतो किंवा त्या गोष्टी ओघाओघाने आपल्या वापरात येतात. कित्येक असे शॉर्ट वर्ड्सही असतात, अर्थात असे लहान शब्दही असतात ज्यांचा आपण सर्रास वापर करतो. 

कित्येकदा तर आजुबाजूच्यांना पाहूनच आपण या शब्दांचा वापर करु लागतो, किंवा तो शब्द बोलण्यास सुरुवात करतो. असाच शब्द म्हणजे 'K'. 

बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की हजार ऐवदी K वापरला जातो. युट्यूबर्स, इन्स्टाग्रामर्स याचा बराच वापर करताना दिसतात. पण, या K चा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

काय आहे K मागचं सिक्रेट ? 
ग्रीक शब्द  ‘Chilioi’ म्हणजे हजार. असं म्हटलं जातं की हा K तिथूनच जन्माला आला. तेव्हापासूनच हजारऐवजी फक्त K वरच निभावलं जाऊ लागलं. 

बायबल या धर्मग्रंथामध्येही K चाच उल्लेख आहे.  ‘Chilioi’ या ग्रीक शब्दाचा वापर जेव्हा फ्रेंच भाषेत करण्यात आला तेव्हा याचा अर्थ किलोग्राम असा झाला. 

कोणत्याही गोष्टीला हजारने गुणिले केल्यास येणारं परिमाण किलोमध्ये असतं. जसं, 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 

इंग्रजीत हा शब्द लिहिताना त्याची सुरुवात K नं होते. हे हजाराचं प्रतीक मानलं जातं. ज्यामुळं आपण हजार ऐवजी K लिहिण्यावर भर देतो.