देशाच्या राजकारणातील रहस्यमयी प्रकार! 23 वर्षांपासून 200 आमदारांपैकी एका आमदारासोबत नेमकं असं काय घडतयं?

राजस्थान विधानसभेत आमदारांची संख्या कमी होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. 200 विधानसभा सदस्य असलेल्या राजस्थानच्या विधानभवनात आमदारांची संख्या पुन्हा एकदा 199 वर आलीय.. गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेलं हे गौंडबंगाल काय आहे?

वनिता कांबळे | Updated: Aug 10, 2024, 11:16 PM IST
 देशाच्या राजकारणातील रहस्यमयी प्रकार! 23 वर्षांपासून  200 आमदारांपैकी एका आमदारासोबत नेमकं असं काय घडतयं? title=

Rajasthan Legislative Assembly : राजस्थान विधानसभेमध्ये आमदाराचं संख्याबळ आहे 200... आहे, मात्र, अनेक वर्षांपासून राजस्थानच्या विधानसभेमध्ये कधीच 200 आमदार दिसले नाहीत. फक्त 199 आमदारच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.. राजस्थान विधानसभेत जेव्हा जेव्हा  आमदारांची संख्या 200 असते, तेव्हा कोणाचा तरी अपघाती मृत्यू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

दोन दिवसांपूर्वी सलूम्बर मतदारसंघाचे भाजप आमदार अमृत लाल मीणा यांचं हार्टअटॅक आल्यानं निधन झालंय.. त्यामुळे 200 आमदारांची संख्या पुन्हा199 वर आली. राजस्थानमधील जनतेसाठी सर्वसामान्य गोष्ट नाही आहे.. कारण गेल्या 23 वर्षांपासून राजस्थान विधानसभेत ही परंपरा दिसत असल्याचा दावा केला जातोय.

मागील वर्षी राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्येही 199 मतदारसंघामध्येच निवडणूक होऊ शकलीय. यामध्ये करणपूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी करणपूर मधील निवडणूक स्थगित करण्यात आली होती..

2001 मध्ये राजस्थानमध्ये नवीन विधानभवनाचं बांधकाम झालं होतंय.. तेव्हा पासून विधानसभा सदस्यांची संख्या ही 200 ऐवजी 199 राहत असल्याचं दिसून येतंय.. जेव्हा 200 आमदारांची संख्या पूर्ण होते तेव्हा कुणाचं तरी अचानक निधन होतंय.. मात्र ही अंधश्रद्धा असल्याचा दावा करण्यात आलाय.

नवीन विधानभवनाच्या स्थापनेनंतर आतापर्यंत 17 आमदारांचा मृत्यू झालाय.. 2008 ते 2013 पर्यंत 200 आमदार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत होते, मात्र, 2013 च्या नंतर 199 ही सदस्य आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.. त्यामुळे यावरून अनेक प्रकारचे संशय व्यक्त केल्या जात आहेत.. याची सत्यता झी न्यूजच्या प्रतिनिधींनी करण्याचा प्रयत्न केलाय..

या सर्व घटनांबाबत सरकारला माहिती आहे.. सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक वेळा उपाययोजना करण्याचे प्रयत्न झालेत... मात्र, हा प्रकार सतत सुरूच आहे.. वसुंधरा राजे यांच्या सरकारमधील 4 आमदारांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मागच्या गहलोत सरकारमध्येही 7 आमदारांचा मृत्यू झाला होता.. आता हीच परंपरा भजनलाल यांच्या कार्यकाळतही सुरूच आहे..