IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...

तिकीट दलालांना रोखण्यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC) हे मोठं पाऊल उचललं आहे.   

Updated: Jun 28, 2021, 10:43 PM IST
IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट काढताना Aadhaar आणि PAN समोर ठेवा, कारण...

मुंबई : रेल्वे परवडणाऱ्या दरात तसेच वेळेत पोहचवते, त्यामुळे दूरच्या प्रवासात नेहमीच रेल्वेला पसंती दिली जाते. अनेक जण IRCTC च्या वेबसाईटवरुन ऑनलाईन तिकीट बूक (IRCTC Booking Update) करतात. पुढच्या वेळेस ऑनलाईन तिकीट बुक करताना आयआरसीटीसी तुमच्याकडे पॅन (PAN) तसेच आधार कार्डाची (Aadhar) मागणी करु शकते. तिकीट दलालांना रोखण्यासाठी आयआरसीटीसीने हे मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (Without Aadhaar and PAN you will not be able to book tickets now Railway is preparing)  
 
आयआरसीटीसीची नवी तिकीट प्रणाली

आयआरसीटीसी नवीन तिकीट प्रणाली तयार करण्यासाठी वेगाने काम करत आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आधार-पॅन लिंक करणं बंधनकारक असणार आहे. जेव्हा जेव्हा प्रवाशांकडून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगीन कराल, तेव्हा प्रवाशांना आधार, पॅन किंवा पासपोर्टचा क्रमांक टाकावा लागेल.  
 
पॅन आधारसह रेल्वे तिकीट लिंक

रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, "रेल्वे आयआरसीटीसीशी कागदपत्रे जोडण्याच्या योजनेवर काम करतेय. यापूर्वी फसवणूकी  विरोधात कारवाई केली जात होती. पण त्याचा परिणाम पुरेसा नव्हता. शेवटी आम्ही तिकिटात लॉग इन करताना पॅन, आधार किंवा इतर ओळख कागदपत्रांसह त्याचा दुवा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आम्ही तिकिट बुकिंगची फसवणूक थांबवू शकतो". 
 
लवकरच नवीन तिकीट प्रणाली 

अरुण कुमार म्हणाले, "आम्हाला आधी यासाठी नेटवर्क तयार करण्याची गरज आहे. आधारसोबत आमचे कार्य जवळजवळ पूर्ण झालेय. तितक्या लवकर संपूर्ण यंत्रणा काम करण्यास तयार होईल,  त्याची अंमलबजावणी केल्यानंतर आम्ही नव्या तिकीट प्रणालीची सुरुवात करु. दलालां विरोधात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2019 मध्ये कारवाई सुरू करण्यात आली होती, तेव्हापासून ते आतापर्यंत 14 हजार 257 दलालांना आम्ही अटक केली आहे. तसेच आतापर्यंत 28 कोटी 34 लाख बनावट तिकीट जप्त करण्यात आली आहेत". 

संबंधित बातम्या : 

सामन्यांसाठी Local Railway बंद, प्रवास कसा करायचा? व्यथा मांडणाऱ्या युवकाचा व्हीडिओ व्हायरल

येत्या काळात अंधेरी स्टेशनचा कायापालट होणार! वर्ल्डक्लास सुविधांनी सुसज्ज वास्तू

'हा' पास असेल तरच लोकल प्रवासाची मुभा, ठाकरे सरकारचा नवा निर्णय