22 Snakes in Bag Woman arrested Video : विमातळावरील सोने, हिरे मोती आणि अंमली पदार्थ आणि शस्त्राची तस्करी करताना अनेकांना विमानतळ पोलिसांनी गजाआड केलं आहे. पण एका महिलेच्या सामानातील बॅगेची झाडाझडती घेतली असता. तिच्या बॅगेतून एक नाही दोन नाही तब्बल 22 प्रजातीचे साप निघाले. तिची बॅग बघून सुरक्षा रक्षण आणि विमानतळ पोलिसांच्या हृदयाचे ठोके चुकले. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ माजली.
हे साप बघण्यासाठी विमानतळावर प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल 2023 शुक्रवारी चेन्नई विमानतळावर घडली आहे. कस्टम्सने तिला थांबवलं असता तिच्या सामानात अनेक प्लास्टिकच्या डबे होते. ज्यात वेगवेगळ्या प्रजातीचे साप ठेवलेले होते. एवढंच नाही तर तिच्या सामानातून एक गिरगिटही जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान चेन्नई कस्टम्सने शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोना, चांदी, हेरोइन, गांजा, कोकीन और भी बहुत कुछ की तस्करी कवर कर चुका हूँ, लेकिन #chennaiairport पर #सांप की #smuggling का मामला हैरान करने वाला है।@ChennaiCustoms pic.twitter.com/3yjngji1Wx
— Gautam Kumar Mishra (@gkmishra79) April 29, 2023
फ्लाइट क्रमांक AK13 ने क्वालालंपूरहून ही महिला आली होती.
On 28.04.23, a female pax who arrived from Kuala Lumpur by Flight No. AK13 was intercepted by Customs.
On examination of her checked-in baggage, 22 Snakes of various species and a Chameleon were found & seized under the Customs Act, 1962 r/w Wildlife Protection act, 1972 pic.twitter.com/uP5zSYyrLS— Chennai Customs (@ChennaiCustoms) April 29, 2023
ही महिला इतक्या सापांचं काय करणार होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलीस तपासातून शोधत आहेत. ANI नेही या घटनेचा व्हिडीओ त्यांचा अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे.
#WATCH | Tamil Nadu: On 28th April, a female passenger who arrived from Kuala Lumpur by Flight No. AK13 was intercepted by Chennai Airport Customs. On examination of her checked-in baggage, 22 snakes of various species and a chameleon were found & seized under the Customs Act,… pic.twitter.com/tQCmdElZkm
— ANI_HindiNews (@AHindinews) April 29, 2023
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अधिकारी एका दांडक्याचा वापर करुन सावधपणे सापांना बाहेर काढताना दिसत आहेत.