दिल्ली मेट्रोमध्ये प्रेमाचा झांगडगुत्ता; Kissing च्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस!

Delhi Metro Viral Video :दिल्ली मेट्रोच्या डब्यात एक तरुण जोडपं खाली बसून प्रवास करत होतं. व्हायरल क्लिपमध्ये मुलगी मुलाच्या मांडीवर पडली असून तरुण तिचं चुंबन (Young Couple Kissing Video) घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय,

Updated: May 10, 2023, 08:50 PM IST
दिल्ली मेट्रोमध्ये प्रेमाचा झांगडगुत्ता; Kissing च्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस! title=
Couple Kissing In Delhi Metro Video

Delhi Metro Kissing Video: काही दिवसांपासून दिल्लीच्या मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल (Delhi Metro Viral Video) होत असतात. कोणी मेट्रोमध्ये अंघोळ करतंय, तर कोणी गोधडी घेऊन झोपतंय. त्यामुळे दिल्ली मेट्रोमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. त्याचबरोबर मेट्रोमधील कपल किसिंगचे व्हिडिओ (Couple Kissing Video) देखील तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमधील  बिकिनी गर्लचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातच आता कपलच्या किसिंगचा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय झालं?

दिल्ली मेट्रोच्या डब्यात एक तरुण जोडपं खाली बसून प्रवास करत होते. व्हायरल क्लिपमध्ये मुलगी मुलाच्या मांडीवर पडली असून तरुण तिचं चुंबन घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. एक काळा शर्ट घातलेला मुलगा मेट्रोच्या फ्लोअरवर बसला. त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन त्याची प्रेयसी झोपलेली दिसत आहे. या मुलीने लाल-काळ्या रंगाचा शर्ट घातलाय. व्हिडिओ ट्रेंडमध्ये आल्यानंतर आजची तरुणाई कुठे अडकली आहे? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे.

काही लोकांनी ट्विट करून 'दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन' (DMRC) ला अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची विनंती केली आहे. या व्हिडिओवर दिल्ली पोलिस (Delhi Police) पाऊलं उचलत असल्याचं दिसतंय.  या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दोघेही न डगमगता एकमेकांना लिप लॉक करत असल्याने तुम्ही दिल्ली मेट्रोचे नाव बदलून पॉर्नहब का करत नाही? असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय. 

पाहा Video

दरम्यान, व्हिडिओ शेअर होत असल्याने आत्तापर्यंत  1 लाख 75 हजारहून अधिक व्ह्युज या व्हिडिओला मिळाले आहेत. समोर बसलेल्या प्रवाशांनी हा व्हिडिओ शूट करून दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांना निशाण्यावर घेतलंय. 'दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन' च्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स कायद्याच्या कलम-59 अंतर्गत असभ्यता हा दंडनीय गुन्हा मानला जातो. त्यामुळे अशा कृत्यांना चाप बसणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.