कोकणवासींयांना गणेश चतुर्थीची मोठी भेट; नितेश राणेंकडून मोफत 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई परिसरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी भेट दिली आहे

Updated: Aug 22, 2021, 03:35 PM IST
कोकणवासींयांना गणेश चतुर्थीची मोठी भेट; नितेश राणेंकडून मोफत 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा title=

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई परिसरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी भेट दिली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत 'मोदी एक्स्प्रेस'ची त्यांनी घोषणा केली आहे.

गणेशोत्सव कोकणातील लोकांसाठी सर्वात मोठा उत्सव मानला जातो. कोकणी माणूस कितीही कामात व्यस्त असला तरी, गावी गणेशोत्सवासाठी हजेरी लावतो. मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी याआधीच ट्विट करून खास भेट देणार असल्याचे सांगितले होते.

आज त्यांनी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मोफत अशा मोदी एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. ही ट्रेन 1800 प्रवाशांची असणार आहे.  7 सप्टेंबर(मंगळवार)सकाळी 10 वाजता ही ट्रेन दादर स्टेशन वरून निघणार आहे.  हा पूर्ण प्रवास निशुल्क असणार आहे. विशेष म्हणजे या पूर्ण प्रवासात एक वेळचे जेवणसुद्धा देण्यात येणार आहे.