मुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या सुट्टी

मुंबईसह कोकणमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.

Updated: Dec 4, 2017, 08:42 PM IST
मुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या सुट्टी title=
Representative Image

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह कोकणमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.

उद्या सुट्टी देण्याचा निर्णय

राज्यातील किनारपट्टी भागातील शाळांना खबरदारीच्या उपाययोजना म्हणून उद्या सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा 

ओखी वादळामुळे कोकण किनारपट्टीवर पुढील अठ्ठेचाळीस तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यातील शाळांना ही सुट्टी देण्यात आलीय.

विनोद तावडे यांनी केलं ट्विट

यासंदर्भात स्वत: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटही केलं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. 

ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढील २४ तास राहणार असून किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासंह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवरच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीेने शालेय शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

४ मच्छीमार बोटी बेपत्ता

दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्याने भरकटलेल्या बोटीतील हजारो मच्छीमार रत्नागिरीतील समुद्र किना-यावर पोहोचले आहेत. तर, अद्यापही ४ मच्छिमार बोटी बेपत्ता आहेत. या ४ बोटींवरील २६ खलाशांसोबत अद्याप संपर्क झालेला नाहीये.