नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांचे सोमवारी कायदेशीर इच्छामरणाद्वारे निधन झाले. दोघेही बरेच दिवस आजारी असून आता त्यांचे वय वर्षे 93 इतके होते. डॉक्टरांच्या मदतीने दोघांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आणि शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांचा हात हातात धरून अखेरचा क्षण घालवला. नेदरलँडमधील कायदेशीर अधिकार संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्यांना जवळच्या कबरमध्ये दफन करण्यात आले.
एग्ट यांचे त्यांची पत्नी यूजीनवर खूप प्रेम होते. काही वर्षांपूर्वी यूजीन यांनी सांगितलं होतं की, ते अजूनही त्यांना 'माय गर्ल' म्हणून हाक मारत. शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखणारे ड्राईस व्हॅन एग्ट आणि त्यांची पत्नी या दोघांनीही वयाची नव्वदी पार केली होती.
(हे पण वाचा - 'आपण पुन्हा भेटू...' लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट)
पती-पत्नीचं नातं हे असंत असतं. या नात्यातला गोडवा मुरांब्यासारखा शेवट शेवटला तो मुरत जातं. एकमेकांसोबत 68 वर्षे एकत्र राहणे हा एक मोठा काळ आहे. एकमेकांच्या सवयीपासून ते त्यांच्या वागणुकीपर्यंतच्या सगळ्याच बाबी आपल्याला लक्षात असतात. पण हे नातं अखेरच्या काळात अशा पद्धतीनेही स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं स्वीकारत असताना तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हेच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
नेदरलँडचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांनी एकमेकांना तब्बल 68 वर्षे साथ दिली. हा काळ खूप मोठा आहे. या काळात अनेक चढ-उतार आले. अशावेळी न डगमगता एकमेकांना खंबीर साथ देणे अत्यंत महत्त्वाची आहे. ही साथ ड्राईस आणि युजीन यांनी एकमेकांना खंबीरपणे दिल्याचे कळते. कारण या काळातच तुम्ही एकमेकांशी कसे वागता यावर तुमचं नातं टिकून असतं.