IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE : आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया... 

IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE Updates:  पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

23 Dec 2022, 16:15 वाजता

IPL 2023 Auction LIVE :  लखनऊ सुपर जायंट्सने 16.25 कोटी रुपयांना निकोलस पूरनला विकत घेतले 

निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. निकोलस पूरन गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.

23 Dec 2022, 16:09 वाजता

IPL 2023 Auction LIVE : बांगलादेशचा लिटन दास ठरला अनसोल्ड 

बांग्लादेश संघातील उत्कृष्ट खेळाडू लिटन दास कोणत्यात टीमने खरेदी केले नाही आहे.लिटन दासचे बेस प्राइस 50 लाख रुपये होते.

23 Dec 2022, 16:04 वाजता

IPL 2023 Auction LIVE : ऑक्शनमध्ये 'या' खेळाडूंना सर्वाधिक बोली 

  • सॅम करण (इंग्लंड) - 18.50 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)
  • कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) - 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)
  • बेन स्टोक्स (इंग्लंड) - 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

23 Dec 2022, 15:54 वाजता

आयपीएल ऑक्शनमध्ये हे खेळाडू राहिले अनसोल्ड 

  • जो रूट (इंग्लंड) - मूळ किंमत 1 कोटी
  • रिले रोसो (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 2 कोटी
  • शाकिब अल हसन (बांगलादेश) - मूळ किंमत - 1.5 कोटी

 

23 Dec 2022, 15:51 वाजता

IPL 2023 Auction LIVE : आयपीएल ऑक्शनमध्ये आतापर्यंत 'या' खेळाडूंची विक्री 

  • केन विल्यमसन (न्यूझीलंड) - 2 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)
  • हॅरी ब्रूक (इंग्लंड) - 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत - 1.5 कोटी)
  • मयंक अग्रवाल (भारत) - 8.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत - 1 कोटी)
  • अजिंक्य रहाणे (भारत) - 50 लाख, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 50 लाख)
  • सॅम कुरन (इंग्लंड) - 18.50 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)
  • ओडियन स्मिथ (वेस्ट इंडिज) - 50 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत - 50 लाख)
  • सिकंदर रझा (झिम्बाब्वे) - 50 लाख, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत 50 लाख)
  • जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) - 5.75 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत 2 कोटी)
  • कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) - 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)
  • बेन स्टोक्स (इंग्लंड) - 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

23 Dec 2022, 15:48 वाजता

IPL 2023 Auction LIVE :बेन स्टोक्स चेन्नईच्या ताफ्यात, 16.25 कोटी रुपयांना खरेदी

चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. स्टोक्सला विकत घेण्यासाठी राजस्थान, आरसीबी, लखनौचे संघही स्पर्धेत होते

23 Dec 2022, 15:45 वाजता

IPL 2023 Auction LIVE : कॅमेरून ग्रीन 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सकडून खरेदी 

कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना विकत घेतले आहे. आयपीएल लिलावात विकला गेलेला दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला आहे. 

23 Dec 2022, 15:43 वाजता

IPL 2023 Auction LIVE : कॅमेरून ग्रीन 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सकडून खरेदी 

कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना विकत घेतले आहे. आयपीएल लिलावात विकला गेलेला दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला आहे. 

23 Dec 2022, 15:39 वाजता

IPL 2023 Auction LIVE :जेसन होल्डर राजस्थान रॉयल्स संघात 

 राजस्थान रॉयल्स संघाने 5.75 कोटीला जेसन होल्डरला केले खरेदी 

23 Dec 2022, 15:33 वाजता

IPL 2023 Auction LIVE : सिकंदर रझा पंजाब संघात 

पंजाब संघाकडून सिकंदर रझाची 50 लाखाला खरेदी

गुजरात टायट्न्सकडून ओडेन स्मिथची 50 लाखाला खरेदी