IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE : आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया... 

IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE Updates:  पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

23 Dec 2022, 17:12 वाजता

IPL 2023 Auction LIVE : हैदराबादने उपेंद्र यादवला 25 लाखांना खरेदी केले 

सनरायझर्स हैदराबादने उपेंद्र यादवला 25 लाखांना विकत घेतले आहे. तर मोहम्मद अझरुद्दीनला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.

23 Dec 2022, 17:10 वाजता

IPL 2023 Auction LIVE : एन. जगदीशन कोलकाता नाईट रायडर्सकडून 90 लाखांना खरेदी

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग पाच शतके झळकावणाऱ्या एन. जगदीशनला कोलकाता नाईट रायडर्सने 90 लाख रुपयांना विकत घेतले आहे. जगदीशनची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. 

केएस भारतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

23 Dec 2022, 17:08 वाजता

IPL 2023 Auction LIVE : CSK ने निशांत सिद्धूला 60 लाखांना केले खरेदी 

चेन्नई सुपरकिंग्जने 19 वर्षाखालील स्टार खेळाडू निशांत सिद्धूला 60 लाख रुपयांना विकत घेतले आहे. निशांतची मूळ किंमत 20 लाख रुपये होती आणि केकेआरनेही त्याच्यासाठी बोली लावली. 

23 Dec 2022, 17:00 वाजता

IPL 2023 Auction LIVE : सनरायझर्स हैदराबादकडून विवरांत शर्मा 2.60 कोटी रुपयांना खरेदी

जम्मू-काश्मीरच्या विवरांत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. विवरांतला विकत घेण्यासाठी केकेआरनेही बोली लावली होती. 

23 Dec 2022, 16:59 वाजता

IPL 2023 Auction LIVE :  शेख रशीद चेन्नईच्या ताफ्यात, 20 लाखांना विकत घेतले

चेन्नई सुपर किंग्जने शेख रशीदला 20 लाख रुपयांना विकत घेतले आहे. रशीदची मूळ किंमत फक्त 20 लाख होती. त्याचवेळी दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या हिम्मत सिंगला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही.

23 Dec 2022, 16:54 वाजता

IPL 2023 Auction LIVE : हैदराबादने मयंक मार्कंडेला 50 लाख रुपयांना खरेदी केले 

सनरायझर्स हैदराबादने मयंक मार्कंडेला 50 लाख रुपयांना खरेदी केले आहेत. 

23 Dec 2022, 16:33 वाजता

IPL 2023 Auction LIVE : आदिल रशीद सनरायझर्स हैदराबादकडून दोन कोटी रुपयांना खरेदी

आदिल रशीदला सनरायझर्स हैदराबादने दोन कोटी रुपयांना खरेदी केले. तर अॅडम झंपा, मुजीब उर रहमान, तबरेझ शम्सी आणि अकील हुसेन हे विकले गेले नाहीत.

23 Dec 2022, 16:30 वाजता

IPL 2023 Auction LIVE : ईशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले 

  • ईशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. इशांत शर्मा सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. 
  • रिचर्डसनला मुंबईने इंडियन्सने दीड कोटी रुपयांना केले खरेदी 
  • इंग्लंडच्या रीस टोपलीला आरसीबीने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 
  • जयदेव उनाडकट 50 लाख रुपयांत लखनौ सुपर जायंट्सकडे गेला.

23 Dec 2022, 16:25 वाजता

IPL 2023 Auction LIVE : दिल्ली कॅपिटल्सने फिल सॉल्टला 2 कोटी रुपयांना विकत घेतले

इंग्लंडच्या फिल सॉल्टला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सॉल्टची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

23 Dec 2022, 16:19 वाजता

IPL 2023 Auction LIVE : सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेन 5.25 कोटींना विकत घेतले

हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरने देखील क्लासेनला 1 कोटीच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यासाठी बोली लावली होती.