IPL 2023 Auction LIVE Updates: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.
23 Dec 2022, 12:49 वाजता
एका संघात किती खेळाडू असू शकतात?
मिनी लिलावाच्या शेवटी, प्रत्येक संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. या दरम्यान प्रत्येक संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू असू शकतात. या लिलावात एकूण 10 फ्रँचायझी जास्तीत जास्त 206.5 कोटी रुपयांची सट्टा लावतील.
23 Dec 2022, 12:23 वाजता
लिलावापूर्वी सर्व 10 संघांचे थकबाकीदार पर्स
सनरायझर्स हैदराबाद - 42.25 कोटी (13 स्लॉट)
पंजाब किंग्स - 32.2 कोटी (9 स्लॉट)
लखनौ सुपर जायंट्स - 23.35 कोटी (10 स्लॉट)
मुंबई इंडियन्स - 20.55 कोटी (9 स्लॉट)
चेन्नई सुपर किंग्स - 20.45 कोटी (7 स्लॉट)
दिल्ली कॅपिटल्स - 19.45 कोटी (5 स्लॉट)
गुजरात टायटन्स - 19.25 कोटी (7 स्लॉट)
राजस्थान रॉयल्स - 13.2 कोटी (9 स्लॉट)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 8.75 कोटी (7 स्लॉट)
कोलकाता नाइट रायडर्स - 7.05 कोटी (11 स्लॉट)
23 Dec 2022, 12:16 वाजता
जास्तीत जास्त किती खेळाडूंवर बोली लागणार?
405 खेळाडूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत. तर 131 परदेशी खेळाडू आहेत. या 132 खेळाडूंपैकी 4 सहकारी देशांतील आहेत. एकूण 119 कॅप्ड खेळाडू आहेत. तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या २८२ आहे. या लिलावात जास्तीत जास्त 87 स्लॉट उपलब्ध आहेत म्हणजेच जास्त खेळाडू विकत घेतले जाणार नाहीत. 87 खेळाडूंपैकी जास्तीत जास्त 30 खेळाडूच परदेशी असू शकतात.
23 Dec 2022, 12:10 वाजता
टीव्हीवर आयपीएल लिलाव 2023 कुठे पाहणार?
IPL 2023 लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
23 Dec 2022, 12:06 वाजता
सनरायझर्स हैदराबादचा संघ असा असेल
राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
23 Dec 2022, 12:02 वाजता
IPL 2023 Auction Live : या देशांतील खेळाडूंचा लिलावात सहभाग असणार
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) लिलावात भारतातील सर्वाधिक 273 खेळाडू दिसणार आहेत. भारताशिवाय इतर 12 देशांच्या खेळाडूंचाही यात समावेश असणार. या यादीत इंग्लंडचे सर्वाधिक 27 खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिका (22), वेस्ट इंडिज (20), ऑस्ट्रेलिया (21), न्यूझीलंड (10), श्रीलंका (10), अफगाणिस्तान (8), आयर्लंड (4) , नेदरलँड (1), बांगलादेश (4), झिम्बाब्वे (2) आणि नामिबिया (2) या खेळाडूंचाही समावेश होता. लिलावात 10 संघांसह केवळ 87 स्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे या लिलावात न विकलेल्या खेळाडूंची यादी मोठी असणार आहे.
23 Dec 2022, 12:00 वाजता
IPL 2023 Auction Live : आयपीएल लिलावाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?
Jio सिनेमावर IPL 2023 लिलावाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.