IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE : आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया... 

IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

IPL 2023 Auction LIVE Updates:  पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

23 Dec 2022, 15:29 वाजता

IPL 2023 Auction LIVE : सॅम करनची 18.50 कोटी रूपयांना खरेदी

इंग्लंडच्या सॅम करन पंजाब संघाकडून 18.50 कोटी रूपयांना खरेदी

 

23 Dec 2022, 14:47 वाजता

IPL 2023 Auction LIVE : शाकिब अल हसन राहिला अनसोल्ड 

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही.

23 Dec 2022, 14:34 वाजता

IPL 2023 Auction Live: थोड्याच वेळात आयपीएलचा लिलाव सुरू होणार

आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. या आयपीएलला 2023 सुरूवात होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. दुपारी 2.30 वाजल्यापासून लिलाव सुरू होईल. या हंगामाच्या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. मात्र, सर्व 10 संघांमध्ये केवळ 87 जागा रिक्त आहेत. 

23 Dec 2022, 14:33 वाजता

IPL 2023 Auction Live: सर्व संघांनी तयारी केली आहे

आयपीएल 2023 च्या लिलावासाठी सर्व आयपीएल संघांनी पूर्ण तयारी केली आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सर्व संघ अष्टपैलू खेळाडूंना खरेदी करताना अधिक पाहू शकतात.

23 Dec 2022, 14:27 वाजता

IPL 2023 Auction Live : आयपीएलमधील कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक

सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रु

पंजाब किंग्ज 32.2 कोटी रु

लखनौ सुपर जायंट्स रु. 23.35 कोटी

मुंबई इंडियन्स रु. 20.55 कोटी

चेन्नई सुपर किंग्ज रु. 20.45 कोटी

गुजरात टायटन्स 19.25 कोटी रु

दिल्ली कॅपिटल्स रु. 19.45 कोटी

राजस्थान रॉयल्स 13.2 कोटी रु

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 8.75 कोटी रु

कोलकाता नाईट रायडर्स 7.05 कोटी रु

23 Dec 2022, 14:04 वाजता

IPL 2023 Auction Live: असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ? 

Mumbai Indians चे कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह, अर्जुन तेंडुलकर.

Mumbai Indians ने काढून टाकलेले खेळाडू : किरॉन पोलार्ड, रिले मेरेडिथ, डॅनियल सायम्स, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, टिमल मिल्स, संजय यादव, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी.  

23 Dec 2022, 14:00 वाजता

IPL 2023 Auction Live :  हैदराबादचा कर्णधार कोण असेल?

सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं. परिणामी आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज करण्यात आले आहे.

23 Dec 2022, 13:30 वाजता

IPL 2023 Auction Live: हे पाच मोठे खेळाडू आयपीएलमध्ये नसणार

ख्रिस वोक्स, ड्वेन ब्राव्हो, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ सारखी मोठे खेळाडू यपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. 

23 Dec 2022, 13:04 वाजता

IPL 2023 Auction Live : संपूर्ण हंगामात इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळतील

जूनपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका खेळवली जाणार आहे, त्यामुळे हे खेळाडू संपूर्ण हंगामाचा भाग असतील की नाही, असा प्रश्न सर्व फ्रँचायझींच्या मनात होता. यावर अपडेट देताना बीसीसीआयने म्हटले आहे की या दोन्ही देशांचे खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. सर्व फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचे 21 आणि इंग्लंडचे 27 खेळाडू सहभागी होणार आहेत.

23 Dec 2022, 13:00 वाजता

हे खेळाडू मध्यावर त्यांच्या देशात परतणार

बीसीसीआयने सर्व संघांना मेलद्वारे हे अपडेट दिले आहे की, बांगलादेशचे काही खेळाडू हंगामाच्या मध्यात त्यांच्या देशात परततील. आयर्लंड मालिकेसाठी निवडलेले बांगलादेशी खेळाडू 8 एप्रिल ते 1 मे या कालावधीतच उपलब्ध असतील. त्याचवेळी 8 एप्रिलपासून श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू हंगामाच्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार आहेत.