मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार

विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सरकारकडून पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात येतो.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 28, 2018, 08:52 PM IST
मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार  title=

पिंपरी चिंचवड : विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सरकारकडून पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात येतो.

नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या सगळ्या नावांपैकी एक नाव म्हणजे मुरलीकांत पेटकर.... अपंगत्वावर मात करत मुरलिकांत पेटकर ह्यांनी  स्विमिंग खेळात आत्ता पर्यन्त देशासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत, भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केला आहे ,मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लापुरचे रहिवासी असलेले मुरलिकांत आता ,पिंपरी चिंचवडकर झाले आहेत.पद्मश्री पुरस्कारामुळे केलेल्या कामाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

मुरलिकांत पेटकर ह्यांनी  स्विमिंग खेळात आत्ता पर्यन्त देशासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत, भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केला आहे ,मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लापुरचे रहिवासी असलेले मुरलिकांत आता ,पिंपरी चिंचवडकर झाले आहेत....त्यांना  हा पुरस्कार का मिळाला हे त्यांच्या करकीर्दीवर नजर टाकली की स्पष्ट होते...! 

लष्करात दाखल झालेल्या मुरलिकांत पेटकर यांनी 1964 मध्ये जपान इथे झालेल्या क्रिडा स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व केलं... तर 1965 च्या युध्दात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता... यावेळी शत्रूशी लढताना नऊ गोळ्या लागल्यानं त्यांना अपंगत्व आल... 1969 मध्ये इंग्लंड इथे अपंगांच्या पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला,याबद्दल इंग्लंडच्या राणी कडून त्यांना सुवर्ण पदक बहाल करण्यात आलं... तर 1972 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताला पहिलं सुवर्ण पदक पटकावून दिलं... 1975 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिव छत्रपती क्रीड़ा पुरस्कारांने त्यांचा सन्मान करण्यात आला...आत्ता पर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी एकूण127 सुवर्ण तर 154 रौप्य पदक पटकावली आहेत...

पद्मश्री पुरस्कारामुळे केलेल्या कामाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली... युध्दात प्रत्यक्ष रणभूमीवर जाऊन शत्रूशी दोन हात करणा-या या लढवय्या वीराला अपंगत्व येऊनही त्यांची विजिगीषु वृत्ती तशीच टीकून आहे... आणि म्हणूनच संपूर्ण देशाला त्यांच्या या कतृत्वाचा अभिमान आहे...