मुंबई : आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढले. धारावीत कोरोनामुळं आज ५ जणांचा मृत्यू झाला असून आणखी २५ रूग्ण वाढले आहेत. धारावीत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ८०८ झाली आहे. तर यातील २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- दादरमध्ये कोरोनामुळं एकाचा मृत्यू झाला असून २१ नवे रूग्ण वाढले आहेत. दादरमधील एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ८७ असून यातील १७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दादरमध्ये कोरोनामुळं एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- माहिममध्ये कोरोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. माहिममध्ये आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या १०७ असून त्यातील २३ जण बरे झाले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- नवी मुंबईत कोरोनाचे आज ४३ रुग्ण वाढले. एकूण रुग्ण संख्या ५२७ वर पोहोचली असून आणखी १४४९ जणांचे कोरोना रिपोर्ट प्रलंबित आहेत.
- अकोल्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी ८ ने वाढली. एकूण १११ जणांवर उपचार सुरु
- रायगडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या २०० च्या वर, जिल्ह्यात आज १७ रुग्ण वाढले
- बदलापूरमध्ये आज पुन्हा ३ नवे कोरोना रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या ४८ वर. तर २० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक नव्याने कोरोनाबाधित 27 रुग्ण आढळले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे ५ रुग्ण वाढले.
- नाशिक जिल्ह्यात आज एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५७२ वर पोहोचली आहे. (एकूण बरे झालेले - ४५, मृत-१९)
मुंबई महानगरपालिका: १२,१४२ (४६२)
ठाणे: १०१ (२)
ठाणे मनपा: ७२४ (८)
नवी मुंबई मनपा: ७१६ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २८४ (३)
उल्हासनगर मनपा: १५
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १९२ (२)
पालघर: ४६ (२)
वसई विरार मनपा: १९४ (९)
रायगड: ८१ (१)
पनवेल मनपा: १३२ (२)
ठाणे मंडळ एकूण: १४,६४८ (४९७)
नाशिक: ४७
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ४५० (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ८२ (१२)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ७५७ (३२)
पुणे: ११० (४)
पुणे मनपा: १९३८ (१३२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२९ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७९ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण: २४५६ (१५१)
कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ५
रत्नागिरी: १७ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७३ (३)
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: ४१८ (१२)
जालना: १२
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४९५ (१३)
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण: ६१ (३)
अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ११२ (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७६ (१०)
यवतमाळ: ९५
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३२१ (२२)
नागपूर: २
नागपूर मनपा: २१० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २१८ (२)
इतर राज्ये: ३४ (८)
एकूण: १९ हजार ६३ (७३१)