सांगलीत भाजपचा विरोधकांना जोरदार धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आर पी आय आणि शेतकरी संघटनेचे आजी माजी नगरसेवक आणि नेते आज भाजपात प्रवेश करणार आहेत

Updated: Jun 5, 2018, 09:13 AM IST
सांगलीत भाजपचा विरोधकांना जोरदार धक्का  title=

सांगली : 'झी २४ तास'ची बातमी तंतोतंत खरी ठरलीय. सांगली महापालिकेतील नगरसेवक आणि नेते असे १३ जण आज भाजपात प्रवेश करणार  आहेत. यामध्ये चार नगरसेवक, दोन माजी नगरसेवक, एक नगरसेवक पुत्र आणि सहा नेते भाजपात जाणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आर पी आय आणि शेतकरी संघटनेचे आजी माजी नगरसेवक आणि नेते आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. 

काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, विवेक कांबळे, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने, महादेव कुरणे यांचा यात समावेश आहे. 

तर जनता दलाचे नेते विठ्ठल खोत, मनसेचे नेते दिघाम्बर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, काँग्रेसचे संदीप आवटी, गणेश माळी, भीमराव बुधनाळे, महेंद्र पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत.