पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील १७ वर्षीय अनिशा लवटेने शैक्षणिक खर्चाच्या चिंतेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिशा पॉलिटेक्निकल कॉलेज तासगाव येथे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकच्या द्वितीय वर्षाला होती. आपल्या शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांनी होणारी ओढाताण अनिशाला बघवत नव्हती. ही होणारी ओढताण थांबवण्यासाठी अखेर अनिशाने घरी पंख्याला साडीने बांधून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनिशाने आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत असा उल्लेख केला आहे. आपण गेल्यावर बहीण आणि भावाला वडील चांगलं शिक्षण देतील असंही त्यात नमूद केलं आहे.
1 एकर जमीन असलेले हनुमंत काशिनाथ लवटे यांना दोन मुली व एक मुलगा, तर अनिशा ही दोन नंबरची मुलगी, ती पाॅलटेक्निकल काॅलेज तासगाव येथे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक ला द्वितीय वर्षाला होती. आपला शिक्षणाशिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण ही अनिशा ला बघवत नव्हती. ही होणारी ओढाताण थांबावी. म्हणून तीने मृत्यूला जवळ केले.
आपण गेल्यावर आपल्या बहिण भाऊ यांना तरी वडील चांगले शिक्षण देतील. मृत्यूपूर्वी अनिशा ने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, असा उल्लेख केला आहे.