२.९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

दोन कोटी नव्वद लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात. 

Updated: Jul 29, 2017, 01:02 PM IST
२.९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त  title=

लोणावळा : दोन कोटी नव्वद लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात. पुण्यातल्या दोन बांधकाम व्यावसायिकांसह आणखी तिघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. उर्से टोल नाक्याजवळ शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आलीय.

४३ वर्षीय नविंदू घनश्याम गोयल आणि ४९ वर्षीय दिलीप सत्यनारायण गुप्ता अशी या दोन्ही बांधकाम व्यावसायिकांची नावं आहेत. त्यांच्यासह चालक गौरव अगरवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

हे तिघेजण मुंबईत या जुन्या नोटा बदलून घेणार होते. पण ते शक्य न झाल्यानं मुंबईहून पुण्याकडे येत असताना याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी पाठलाग करून त्यांची गाडी अडवली. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आलीय.