Nagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान

नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे. 

Updated: Nov 23, 2022, 12:00 PM IST
Nagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान  title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिर्ची मार्केटला (Mirchi Market) भीषण आग लागली. या आगीमध्ये (Fire)शेड मधील मिर्ची पूर्णतः जळून खाक झालेली आहे. या आगीत अंदाजे दोन ते तीन कोटीच्या घरात सुखी मिर्ची जळून नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमध्ये (Short circuit) लागली असावी असाच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (a big fire broke out at the chilli market in kalman)

नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे. कालच या शेडमध्ये इलेक्ट्रिक दुरुस्तीचे काम करण्यात आलं होतं. त्यानंतर मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे एक भीषण दुर्घटना घडवून कोट्यावधी रुपयाची (Crore) मिर्ची जळून खाक झाली आहे. मध्यरात्री दोन वाजता पासून आग विझवण्यासाठी महानगरपालिकेच्या (Municipal) अग्निशमक बंबाकडून पाण्याचा मारा केला जात आहे. जवळपास आठ बंब सुमारे दोन ते तीन फेऱ्या करून पाण्याचा मारा सुरू आहे. आताही मिर्चीमध्ये आग धुसमत आहे. असल्याने सध्या कुलिंग प्रोसेस (Cooling Process) सुरू आहे. या संदर्भात प्राथमिक अंदाजातून चार हजार पोते मिरची जळलेली असल्याचं सांगितलं जात आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजारपेठ (Market) आहे. अनेक वस्तूंची ते खरेदी विक्री होते मात्र असे असले तरी सुरक्षेच्या अनुषंगाने हे पाहिजे त्या उपाययोजना केल्या नसल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनियरची (Engineers) नियुक्ती नसून कालच बाहेरच्या व्यक्तीकडून कडून इलेक्ट्रिक दुरस्तीचं काम करण्यात आलं होतं. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हे दुर्घटना घडली. दुरुस्तीच्या कामात काही त्रुट्या राहिल्या का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भातला सखोल तपास कळमना पोलीस करणार असून सीसीटीव्ही (cctv) सुद्धा तपासले जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी झी 24 तासशी बोलताना दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांनी यासंदर्भात तीन महिन्यापूर्वीच संचालकाच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला होता. यात एकही इलेक्ट्रिशियन नसल्याने मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात शेडमध्ये असलेला शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्याची मिर्ची जळून खाक झाली आहे. या सगळ्या मालाची भरपाई कृषी उत्पन्न बाजार समितीने करावी अशी अतुल सेनाड यांनी केली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिर्ची बाजाराच्या अध्यक्ष महेश बांते यांनी यामध्ये जवळपास दहा ते पंधरा कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचा दावा केलाय. या शेडमध्ये सोमवारीच मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये मिर्चीची खरेदी झाली होती. याखरेदीत शेतकऱ्यांचे चुकारेही देणे बाकी असतानी एवढी मोठी आग लागल्याने शेतकऱ्यांच आणि व्यापारांचा मोठे नुकसान झाले असल्याचे ते सांगतात. यात व्यापारांचे काही दुकाने जळून खाक झाले. तसेच शेडमध्ये असलेल्या दोन्ही बाजूंनी व्यापाऱ्यांचा ठेवलेला सुखी मिर्ची जळून खाक झाली आहे.