Sayaji Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विशेष पत्रकार परिषदेसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादीची मुख्य नेते मंडळी एमसीए क्लबमध्ये उपस्थित होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक असतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
शिरूर हवेली मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.... ठाकरेंचे शिलेदार जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके हे अजित पवारांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा आहे.. हा पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआला धक्का मानला जातोय...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मी माझ्या घरट्यात जाऊन थांबतो, असं म्हणत अजित पवारांनी हे संकेत दिलेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले होते. त्यानंतर अजित पवार शिरूर,कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना सिन्नरमधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली.. त्याला अजित पवारांनी नकार देत बारामती माझी आहे आणि मी बारामतीचा आहे, असं म्हणतं बारामतीतून लढण्याचे संकेत दिलेत...