मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त अॅसिड टँकर हटवला

 मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त झालेला अॅसिड टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. खेडजवळ आयनी फाटा इथं अॅसिड टँकर उलटला होता.

Updated: Dec 24, 2017, 03:16 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त अॅसिड टँकर हटवला title=

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या मधोमध अपघातग्रस्त झालेला अॅसिड टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. खेडजवळ आयनी फाटा इथं अॅसिड टँकर उलटला होता.

क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला

रस्त्याच्या मधोमध हा टँकर आडवा झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस आणि प्रशासनाने क्रेनच्या मदतीने हा टँकर बाजूला केलाय. टँकर बाजूला केल्यानं वाहतूक सुरळीत झालीय. 

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.

नाताळ सुटीमुळे कोंडी

महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळताहेत.  यामुळे पर्यटकांचे हाल होताहेत . बेशिस्त वाहन चालकांचा फटका सर्वानाच सहन करावा लागतोय. विकेंड आणि नाताळ सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत त्यांना या कोंडीत अडकून राहावं लागतं होतं.

महामार्गावर लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्यांमुळे रविवारचा दिवसही वाहतूक कोंडीचा ठरला.  विकेंड आणि नाताळची सुट्टी यामुळे शनिवारपासूनच मुंबईकर कोकणच्या दिशेने निघाले. पर्यटकांच्या गर्दीमुळे विविध महामार्गांवर तुफान वाहतूक कोंडी शनिवारी पाहायला मिळाली.