देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांनीही दिला अयोध्या राममंदिर आंदोलनातील कारसेवेचा पुरावा

संगमनेर 1992 मध्ये कारसेवा केलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. शहरातील फ्रेंड सर्कल हिंदू मंडळाच्या वतीनं 130 हून अधिक कारसेवकांचा करण्यात आला. यामध्ये महिला कारसेवकांचा देखील समावेश होता. सत्कार सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसर राममय झाला.

Updated: Jan 21, 2024, 08:32 PM IST
 देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे यांनीही दिला अयोध्या राममंदिर आंदोलनातील कारसेवेचा पुरावा  title=

Eknath Khadse:  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसेंनीही अयोध्या राममंदिर आंदोलनातील कारसेवेचा पुरावा दिला.  खडसे यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेचा फोटो दाखवलाय. या पत्रिकेत कारसेवक म्हणून एकनाथ खडसेंच्या नावाचा उल्लेख आहे. कारसेवेवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. आरोप करणा-यांना खडसेंनी हे उत्तर दिले.

कारसेवक असल्याचा फोटो शेअर करत फडणवीस यांचे विरोधकांना जोरदार प्रत्त्युतर 

कारसेवक असल्याचा फोटो शेअर करत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार प्रत्त्युतर दिलंय. बाबरी मशिद पाडण्यात आली तेव्हा उपस्थित असण्यावरुन अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले. खासकरुन ठाकरे गटाने नेहमीच फडणवीसांवर आरोप केले. यालाच आता फडणवीसांनी पुरावाच दाखवत प्रत्युत्तर दिलंय. अयोध्येला जाणा-या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळली होती. त्यात देवेंद्र फडणवीस दिसत असल्याचा फोटो शेअर करण्यात आलाय.कारसेवकांच्या गर्दीत डोक्याला पट्टा बांधलेले फडणवीस या गर्दीत दिसतायत.

फडणवीस नागपूर स्टेशनला फिरायला गेले असतील - राऊत यांचा टोला

फडणवीस नागपूर स्टेशनला फिरायला गेले असतील असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या फोटोवर  लगावला. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा तुमचे लोक पळून गेले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्विकारली असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर  टीकासुद्धा केलीय. मात्र मी मुर्खांना उत्तर देत नाही असं म्हणत फडणवीसांनी नाव न घेता राऊतांना जोरदार टोला लगावलाय..

नागपुरातील एका मुस्लिम कारसेवकानं 1992ला अयोध्येत कारसेवा केली

नागपुरातील एका मुस्लिम कारसेवकानं 1992ला अयोध्येत कारसेवा केली होती. मोहम्मद फारुख शेख असं या कारसेवकाचं नाव आहे. त्यावेळी ते 14 वर्षांचे होते..फारूख शेख यांच्या जीवाला धोका असल्यानं त्यांच्यासोबत असलेले हिंदू सहकारी कारसेवक डॉ.तुषार खानोरकर आणि डॉ. सुभाष राऊत यांनी प्रसंगावधान राखत फारुख यांच्या डोक्याला भगवी पट्टी बांधून हा मुलगा शिवा असल्याचे सांगितलं. त्यामुळेच फारुख शेख यांचाजीव वाचला. आता 22 जानेवारीला प्रत्येकानं आपापल्या घरी दिवे लावून राम उत्सव साजरा करा, असं आवाहन फारुख करतायेत.