close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंढेच्या बदलीनंतर फटाके फोडणं शिवसैनिकांच्या येणार अंगलट

तुकाराम मुंढेंच्या समर्थनकांनी शिवसैनिकांच्या या सेलिब्रेशन विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलीयं. 

Updated: Nov 23, 2018, 02:57 PM IST
मुंढेच्या बदलीनंतर फटाके फोडणं शिवसैनिकांच्या येणार अंगलट

नाशिक : तुकाराम मुढेंची नियोजन विभागात सहसचिवपदी बदली झाल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या रामायण बंगल्याबाहेर झालेली आतषबाजी भानसींच्या अंगाशी येण्याची शक्यता वर्तविण्यात येतेयं. नाशिक मगहानगरपालिकेचा कारभार हाताळणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाकडून बदलीचं पत्र हाती मिळालंय. 'शासनानं आपली बदली केली असून आपली नियुक्ती सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकार, नाशिक यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा' असा मजकूर या पत्रात दिसतोय.

काय आहे कारण ?

तुकाराम मुंढे शहरातला भूसंपादन आणि करोडोंचा मोबदला घोटाळा लवकरच उघड करणार होते.

शहरातल्या ६० टक्के इमारती अनधिकृत असल्याचं मुंढेंनी जाहीर केलं होतं. 

नगरसेवक निधी देण्यावरुन मुंढेंचा अनेकवेळा वाद झाला होता. 

आमदारांना निधी खर्च करताना मनपाची आयुक्तांची परवानगी बंधनकारक केली होती.

महापौर रंजना मानसी गटाचा मुंढेंना विरोध होता.

मुंढेंच्या जागी गमे 

मुंढेंच्या जागी आता राधाकृष्ण गमे नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. 9 महिन्यात त्यांची बदली करण्याच आली आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली आता कोठे होणार ?

याबाबत देखील अनेकांना उत्सूकता आहे. कारण ते कोठे ही गेले तरी त्यांचं काम आणि शिस्त ही कधीच बदलत नाही.

प्रश्न अन्नुत्तरीतच 

मुंढे नेहमीच सगळ्या राजकारण्यांना अडचणीचे का ठरतायत ? स्वच्छ आणि सडेतोड कारभाराचं पारदर्शी फडणवीस सरकारलाही वावडं आहे का ? मुंढेंच्या वारंवार बदल्या करुन स्वच्छ आणि धडाडीच्या अधिकाऱ्यांना दडपलं जातंय का ? लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे कायम सरकार झुकणार का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

सेलिब्रेशन करणाऱ्यांविरोधात तक्रार

तुकाराम मुंढेंच्या समर्थनकांनी शिवसैनिकांच्या या सेलिब्रेशन विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलीयं.

दिवसा फटाके वाजवणे हा सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा अर्जदारांनी केलाय.