close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भाजपाचे ६ मंत्री अडचणीत- सुप्रिया सुळे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत.

Updated: Oct 18, 2019, 09:05 AM IST
भाजपाचे ६ मंत्री अडचणीत- सुप्रिया सुळे

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी सगळेच बडे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपचे ६ मंत्री अडचणीत असल्याचं भाजपचा सर्व्हे सांगतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. या ६ मंत्र्यांमध्ये एक नाव राम शिंदेंचं असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

'सहा मंत्री अडचणीत असल्यामुळे भाजप प्रचंड चिंतेत आहे. आपलं पोरगं पास होणार का नापास? हे आईलाच माहिती असतं. आता भाजपचं म्हणतं माझं पोरगं नापास होणार. त्यामुळे रोहित पवारने आरामात बसलं पाहिजे. २-४ दिवस प्रचार केला नाही तरी चालतंय. तुम्ही निवडून येतातच आहात. हे मी नाही भाजप म्हणतेय', असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.   

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांची कर्जतमध्ये सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या सभेसाठी अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवारही उपस्थित होते. रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याही प्रचार सभेला उपस्थित होत्या. रोहित पवार यांच्यापुढे कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचं आव्हान आहे.