close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गिरीश महाजन, बारामतीत या तुम्हाला दाखवतो : अजित पवार

 अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

Updated: Jan 18, 2019, 11:28 PM IST
गिरीश महाजन, बारामतीत या तुम्हाला दाखवतो : अजित पवार

जळगाव : मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू', असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. मात्र, बारामती काय आहे ते माहिती आहे का? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त पारोळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केले आहे. 

गेल्या ५० वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. उगाच काहीही, उचलली जीभ लावली टाळूला. तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले. दरम्यान, भाजप सेनेच्या सरकारमध्ये वाचाळ वीरांची पलटण असल्याची टीकाही अजित पवारांनी यावेळी केली.