अक्कलकोट-गाणगापूर रोडवर कारला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

ही कार अहमदनगरहून गाणगापूरला आली होती. कारमधील लोक दर्शनासाठी येथे आले असल्याचे सांगितले जात आहे.

Updated: Mar 11, 2022, 09:43 PM IST
अक्कलकोट-गाणगापूर रोडवर कारला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू title=

अक्कलकोट : सोलापुरातील अक्कलकोट येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका गाडीचा भयानक अपघात झाला आहे. या अपघातात 5 लोकांना जागीच मृत्यू धाला आहे. ही घटना गाणगापूर रोडवर घडली. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत आणि त्यांनी या पाचही जणांचा मृतदेह कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला आहे. मृतांच्या कुटुंबाबात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातामध्ये 4 महिला आणि 1 चालक असे एकुण 05 जण जागीच ठार झाले आहे. ही कार अहमदनगरहून गाणगापूरला आली होती. कारमधील लोक दर्शनासाठी येथे आले असल्याचे सांगितले जात आहे.

गाणगापूरहून परत अहमदनगरला परतत असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटला, ज्यामुळे त्यांच्या भरधाव कार झाडाला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की, या पाचही लोकांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.

कर्नाटकातील अफझलपूर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.